नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या (Sonegaon Police Station Case) हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर घटना उघडकीस आली आहे. भारतीय हवाई दलात (Indian Air Force) कार्यरत असलेल्या एका सैनिकाच्या चोवीस वर्षीय विवाहित पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर तिची अश्लील व्हिडिओ तयार करून तिला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिचे बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्याचाही प्रयत्न केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन धर्मांध मुख्य नराधमांना अटक केली आहे. (Love Jihad)
(हेही वाचा – भारताची जागतिक स्तरावर मोठी झेप; Most Beautiful Airports च्या यादीत ‘या’ दोन विमानतळाचा समावेश)
जुन्या ओळखीचा गैरफायदा आणि अश्लील व्हिडीओ
पीडित महिला ही जागा खरेदी-विक्रीच्या व्यवसायात (buying and selling) कार्यरत आहे. पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात तैनात असल्याचा फायदा घेत तिच्या एका जुन्या वर्गमित्राने जमीन खरेदीच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला. तिला एका उपाहारगृहात नेऊन थंड पेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि तिचे आक्षेपार्ह छायाचित्र आणि व्हिडीओ चोरून रेकॉर्ड करण्यात आला. ती शुद्धीवर आल्यानंतर व्हिडीओ सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून सुमारे तीन लाख नऊ हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली.
(हेही वाचा – Monsoon 2026 : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत पावसाची स्थिती कशी राहणार? काय सांगतो IMD rain alert)
निर्जन स्थळी नेऊन सक्तीने धार्मिक विधी
हा छळ केवळ पैशांपुरता मर्यादित राहिला नाही, तर संशयित आरोपीने तिच्यावर धर्म बदलण्यासाठी चहुबाजूंनी दबाव आणला. तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन काही लोकांच्या उपस्थितीत तिला घाबरवून जबरदस्तीने विशिष्ट धार्मिक विधी करायला लावले. सुदैवाने, पीडितेचा पती कर्तव्यावरून परत आल्यानंतर तिने हा सर्व भयंकर प्रकार त्याला सांगितला. पती-पत्नींनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी छळवणूक, खंडणी, बळजबरीने धर्मपरिवर्तन आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी मिळवली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

