अद्याप पूर्णपणे सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (Navi Mumbai International Airport) जागतिक पातळीवर एक मोठा बहुमान मिळवला आहे. युनेस्कोच्या सहकार्याने दिल्या जाणाऱ्या या मानाच्या यादीत पहिल्यांदाच भारतातील दोन विमानतळांना एकत्र स्थान मिळाले आहे. वास्तुकला आणि आराखडा (डिझाइन) क्षेत्रातील जगप्रसिद्ध ‘प्रिक्स व्हर्सायल्स २०२६’ (Prix Versailles 2026 award) या जागतिक पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या जगातील अत्यंत सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही (Gopinath Bordoloi International Airport) त्यात समावेश असल्याचे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने सोमवारी सांगितले. (Most Beautiful Airports)
(हेही पहा – Ind A vs SL A, Tri Series : वैभव आणि लंकन खेळाडूमध्ये नेमकं काय घडलं, व्हीडिओतून आलं समोर)
कमळाच्या फुलापासून प्रेरित अभिनव वास्तुरचना
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलची रचना भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळापासून प्रेरित आहे. उत्कृष्ट वास्तुकला, नाविन्यता, पर्यावरणपूरक संकल्पना आणि शाश्वत विकास या निकषांवर या विमानतळाची निवड करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली ही वास्तू प्रवाशांना एक वेगळा आणि सुखद अनुभव देईल अशी आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाचे एक उत्तम प्रतीक म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
(हेही वाचा – Pune-Sainagar Shirdi Express : साई भक्तांसाठी पुणे- साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वे होणार सुरू)
जागतिक स्तरावर बलाढ्य देशांशी स्पर्धा
या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या शर्यतीत भारतासह चीन, जर्मनी, कंबोडिया आणि अमेरिका या देशांमधील विमानतळांचाही समावेश आहे. या बलाढ्य देशांच्या उत्कृष्ट प्रकल्पांसोबत भारताच्या दोन विमानतळांनी स्थान मिळवणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. गुवाहाटी विमानतळाला तिथल्या स्थानिक बांबू आणि सांस्कृतिक वारशावर आधारित आकर्षक रचनेसाठी हा सन्मान मिळाला आहे. या जागतिक मान्यतेमुळे भारताच्या विमानचालन क्षेत्राची क्षमता संपूर्ण जगासमोर अधोरेखित झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

