-
प्रतिनिधी
Disha Salian Case : मुंबईतील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या कलानगर परिसरातील वातावरण आज अचानक कमालीचे तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. परिसरात बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांची वाढती हालचाल यामुळे काहीतरी मोठे आणि अनपेक्षित घडणार असल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगू लागली होती.
दरम्यान, एका बाजूला राजकीय हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे दबाव आणि धमक्यांचे सत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला. संबंधित प्रकरणाचे वकील न्यायालयात बाजू मांडू शकणार नाहीत, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला. या तणावपूर्ण घडामोडींमुळे कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही काळ प्रचंड गोंधळ आणि अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली होती.
(हेही वाचा – Donald Trump यांचा माध्यमांना मोठा दणका! CNN, MS NOW अन् पॉलिटिकोच्या पत्रकारांसाठी व्हाईट हाऊसची दारं बंद; नेमकं कारण काय? )
या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी परिस्थिती हाताळत कलानगरच्या वेशीवरच ही नोटीस स्वीकारली. “या नोटीसमध्ये नेमका काय मजकूर आहे हे मी अजून पाहिलेले नाही, परंतु केवळ ‘स्वीकारली’ (Received) म्हणून मी ही नोटीस घेत आहे,” असे आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर नोटीसचा काही भाग प्रत्यक्ष वाचून दाखवला आणि यामध्ये ५०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आल्याच्या उल्लेखाला दुजोरा दिला.
या संपूर्ण राजकीय नाट्यामागील मूळ कारण म्हणजे, दिवंगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन हे स्वतः आपल्या वकिलांसह थेट ‘मातोश्री’वर धडकण्यासाठी पोहोचले होते. आपल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत, सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तब्बल ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

