Maharashtra Politics : टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज अन् कुणाच्या तरी पोटात उठली तीव्र कळ! एका व्यंगचित्राने खळबळ

9
Maharashtra Politics
Maharashtra Politics
  • प्रतिनिधी

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रतिस्पर्धी गटांमधील संघर्ष आता केवळ जाहीर सभा आणि वक्तव्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो डिजिटल आणि कलात्मक पातळीवरही पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या राजकीय चिखलफेकीनंतर या वादाने आता एक नवे वळण घेतले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विरोधकांच्या मानसिकतेवर आणि राजकीय पोटदुखीवर बोट ठेवण्यासाठी एका वेगळ्याच अस्त्राचा वापर करण्यात आला असून, त्याने सध्या सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

(हेही वाचा – Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानाचा घोळ कायम, पावसात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मैदानात तळं )

समोरच्याची प्रगती आणि त्याला मिळणारा आंतरराष्ट्रीय सन्मान न पचल्यामुळे विरोधकांची कशी अवस्था होते, हे अधोरेखित करण्यासाठी थेट व्यंगचित्राचा आधार घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राजकीय हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत मार्मिक आणि खोचक कल्पना लढवण्यात आली असून, यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिकच पेटला आहे.

या संपूर्ण प्रकरणामागची मुख्य बातमी अशी की, शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणारे एक बोचरे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या चित्रात टीव्हीवर ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये ३ पुरस्कारांनी सन्मान!’ ही ब्रेकिंग न्यूज सुरू असल्याचे दाखवले आहे. ही बातमी पाहताच ठाकरे यांच्या पोटात असह्य वेदना सुरू होतात आणि ते हतबल होऊन, “बंद कर तो टीव्ही, पोटात कळ मारते माझ्या ह्यांची प्रगती बघून!” असा संताप व्यक्त करताना रेखाटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यातील यशावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेत, ‘शिंदेंचे यश खुपल्यामुळेच ठाकरेंना ही राजकीय पोटदुखी जडली आहे’, असा थेट वार या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.