
Mumbai : ओला, उबेर आणि हल्लीच सुरू झालेलं रॅपिडो यासारख्या खासगी अॅप-आधारित टॅक्सी सेवा असतानाचा यांना टक्क देण्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत आहे, असे दिसते, कारण मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि टॅक्सी चालकांच्या फायद्यासाठी राज्यात लवकरच ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’सेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे चालक आणि मालकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे.
हेही वाचा – भारताची जागतिक स्तरावर मोठी झेप; Most Beautiful Airports च्या यादीत ‘या’ दोन विमानतळाचा समावेश
सहकार तत्त्वावर आधारित
भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या नव्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या बाजारात असलेल्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या खासगी कंपन्या चालकांकडून कमिशन आकारतात. यामुळे दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या हातात अतिशय कमी उत्पन्न पडते. या लुटीला पर्याय म्हणून सहकार तत्त्वावर आधारित ही नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
‘भारत टॅक्सी मॉडेल’च्या धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी
दिल्ली आणि कोलकाता येथे सरकारी पाठबळ असलेल्या टॅक्सी सेवा यशस्वी ठरल्यानंतर, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर ‘देवाभाऊ टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ ॲप विकसित केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘भारत टॅक्सी मॉडेल’मुळे देशभरात चालकांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे.’देवाभाऊ सहकार टॅक्सी’ हा मुंबई बँकेचा उपक्रम नसून तो ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्थेचा’ आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
