-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli शाळा नियमितपणे सोमवारी सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून टिळकनगर विद्यामंदिरात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, शासकीय पुस्तके आणि शाळेची दिनदर्शिका देण्यात आली. (Dombivli)
या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती अभिजीत थरवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे, सदस्य महेश नाईक, शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक प्रतिनिधी पल्लवी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव चौधरी यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते. (Dombivli)
(हेही वाचा – MP : ममता बॅनर्जींचा ‘खेला’ झाला, आता उबाठा रडारवर, त्यानंतर पुढचे लक्ष्य कोण? का सुरु आहे फोडाफोडी? )
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे माजी विद्यार्थी असलेले अभिजीत थरवळ यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या आणि विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. (Dombivli)
पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. औक्षण आणि गुलाब पुष्प मिळाल्याने चिमुकले आनंदित झाले होते. शाळेचा पहिला दिवस खूप छान वाटला. नवीन पुस्तके आणि दिनदर्शिका मिळाली, अशी प्रतिक्रिया पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने दिली. पालकांनीही शाळेने केलेल्या स्वागताचे कौतुक केले. (Dombivli)
(हेही वाचा – आपल्यातले ईश्वरी चैतन्य आपापल्या पद्धतीने व्यक्त करायला शिकणे म्हणजेच शिक्षण; Avinash Dharmadhikari यांचे प्रतिपादन)
पहिल्या दिवसाला शैक्षणिक दृष्टी
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाचन आणि अभ्यासाची गोडी लहानपणापासून लागावी, या उद्देशाने शाळेकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या साहित्याचा उत्सुकतेने आनंद घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा जोशी यांनी केले. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

