Shri Ganesh Visarjan : प्रशासनाची अरेरावी भक्तांनी उधळली; पंचगंगेतच झाले बाप्पाचे विसर्जन!

धर्मशास्त्रानुसारच श्री गणेशमूर्ती नदीतच विसर्जन (Shri Ganesh Visarjan) करावयास मिळाल्याविषयी अनेक भाविकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.

12

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे (Shri Ganesh Visarjan) प्रदूषण होते असा कांगावा करत महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदी परिसरात बॅरिकेड्स लावले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या पुढाकारातून गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून नदी परिसरात बॅरिकेड्स (अडथळे) काढले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले. प्रारंभी काही काळ पोलीस आणि प्रशासनाने आलेल्या गणेशभक्तांना ‘बॅरिकेड्स’च्या बाहेर रोखले, तसेच काही काळ शाब्दीक संघर्षही झाला.अखेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेपुढे पोलीस प्रशासनासही नमते घ्यावे लागले आणि नदीत विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला. (Shri Ganesh Visarjan)

ganesh 2

या प्रसंगी ‘जय श्रीराम’, ‘गणपति बाप्पा मोरया’, ‘गणेश गणेश’ यांसह अन्य घोषणांनी पंचगंगा नदीकाठ दणाणून गेला. नंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे पंचगंगा नदी काठावर श्री गणेशाची आरती केली. पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन (Shri Ganesh Visarjan) होऊ नये म्हणून कालच पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावले होते, तसेच १९ सप्टेंबरला सकाळपासून नदीपसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक नदीकाठी जमा झाले आणि त्यांनी बंदी मोडून काढून पंचगंगा नदीत विसर्जन केले.

ajay tsat01a

(हेही वाचा नंदीग्राम पोटनिवडणुकीत २४ तासांत चित्र बदललं; Mamata Banerjee यांना लागोपाठ तीन धक्के, नेमकं काय घडलं?)

धर्मशास्त्रानुसारच श्री गणेशमूर्ती नदीतच विसर्जन (Shri Ganesh Visarjan) करावयास मिळाल्याविषयी अनेक भाविकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. अनेक गणेशभक्तांनी वाजत-गाजत सहकुटुंब येऊन श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. कोल्हापूर शहरात अनेक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी, प्रत्येक प्रभागात, तसेच विविध चौकांमध्ये विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. तेथे काही राजकीय, तसेच लोकप्रतिनिधींनीही आवाहन करणारे फलक लावले होते. काही भाविकांनी विसर्जन कुंडात श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्या. इचलकरंजी शहरातही महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनास दाद न देता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने येथेही गणेशभक्तांनी पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन (Shri Ganesh Visarjan) केले.

या वेळी महापालिका प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी न्यायालयाचे आदेश असल्याने पंचगंगा नदीत विसर्जन करता येणार नाही, असे सांगितले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी ‘राधानगरीच्या टोकापासून ते इचलकरंजीपर्यंत सर्वत्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन (Shri Ganesh Visarjan) करण्यात येते, तर कोल्हापूरमध्येच बंदी का? वर्षभर १८ नाल्यांमधील पाणी नदीत मिसळते तेव्हा महापालिका प्रशासन कुठे जाते? साखर कारखान्यांच्या मळी थेट नदीत मिसळते तेव्हा महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ कुठे जाते? प्रदूषणामुळे नदीकाठावर अनेकवेळा मासे मृत्यूमुखी पडतात तेव्हा प्रशासन काय करते आणि कुठे असते? केवळ हिंदूंच्या सणांनांच प्रशासनास प्रदूषण आठवते का? यांसहन अनेक प्रश्‍नांचा भडीमार केला. यावर महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस प्रशासन निरूत्तर झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.