
-
प्रतिनिधी
Congress चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील निवडणुकीच्या माघारीने काँग्रेस पक्षात मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईला त्यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दरबारात आव्हान दिले आहे. या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली असून, पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Congress)
(हेही वाचा – Konkan Railway चे भाग्य बदलणार! केंद्राकडे पाठवला ४,७०४ कोटींचा प्रस्ताव)
निवडणुकीच्या रिंगणातून अचानक माघार घेतल्यामुळे भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले, ज्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. या घटनेनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अग्रवाल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. मात्र, हे निलंबन पूर्णपणे बेकायदेशीर, मनमानी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. निष्पक्ष चौकशी न करता आणि मला कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता ही कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. (Congress)
(हेही वाचा – Ind W vs Pak W, T20 WC Match : हरमनप्रीतचाही पाक खेळाडूंशी हस्तांदोलनास नकार; पाकशी ‘नो हँडशेक’ धोरण सुरूच)
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अग्रवाल यांनी आपल्या निलंबनाच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक आणि अनेक राज्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे आपली संघटनात्मक पातळी प्रदेशाध्यक्षांच्या समकक्ष असल्याने, प्रदेशाध्यक्षांना आपल्याला निलंबित करण्याचा अधिकारच नाही, असा कायदेशीर पवित्रा त्यांनी घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा गंभीर आरोप करत, अग्रवाल यांनी आता थेट दिल्लीतून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या वादामुळे प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता हायकमांडपर्यंत पोहोचले असून, यावर दिल्लीतून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
