
-
ऋजुता लुकतुके
Ind W vs Pak W, T20 WC Match महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पुन्हा एकदा हस्तांदोलनाचा मुद्दा चर्चेत आला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना यांनी नाणेफेकीदरम्यान पारंपरिक हस्तांदोलन केले नाही. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सुरू असलेली ही भूमिका यावेळीही कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आल्या होत्या. मात्र नाणेफेक पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हस्तांदोलन झाले नाही. यापूर्वी पुरुष आणि महिला संघांच्या भारत – पाकिस्तान सामन्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. शिवाय सामना संपल्यानंतरही खेळाडूंनी आपापसात हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गेल्यावर्षी पहलगाम इथं पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर वर्षभरात झालेल्या भारत – पाक सामन्यांत भारताने हे धोरण कायम ठेवलं आहे आणि महिला टी-२० विश्वचषकातील सामनाही याला अपवाद नव्हता. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
(हेही वाचा – घाई करू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट! Monsoon लांबल्याने कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा)
सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत हरमनप्रीतला या विषयावर प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तिने वादात न पडता, “आम्ही येथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत आणि आमचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच आहे,” असे उत्तर दिले होते. संघातील चर्चाही केवळ क्रिकेटपुरत्याच मर्यादित असल्याचे तिने स्पष्ट केले होते. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
दरम्यान, मैदानावरील निकालाच्या बाबतीत भारताने वर्चस्व गाजवले. स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७० धावा उभारल्या. त्यानंतर दीप्ती शर्माने पाच विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव १०६ धावांत गुंडाळला आणि भारताने ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
(हेही वाचा – Ind W vs Pak W, T20 WC Match : दीप्ती शर्माची एतिहासिक कामगिरी; ५ बळींसह अनोखा विक्रम नावावर)
या सामन्यात हरमनप्रीतने आणखी एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. ती महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आणि तिने मिताली राजचा विक्रम मागे टाकला. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
हस्तांदोलन न झाल्याची घटना चर्चेत असली तरी भारतीय संघाने मैदानावरील कामगिरीनेच सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करत भारताने पुढील फेरीसाठी मजबूत दावेदारी सादर केली आहे. (Ind W vs Pak W, T20 WC Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
