
-
कल्याण, प्रतिनिधी
Avinash Dharmadhikari आपल्यातले ईश्वरी चैतन्य आपापल्या पद्धतीने व्यक्त करायला शिकणे म्हणजेच शिक्षण, असे उद्गार निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी रविवारी डोंबिवलीत बोलताना काढले. डोंबिवलीच्या लोकमान्य गुरूकुल शाळेच्या दशकपूर्ती समारंभात ते बोलत होते. संपूर्ण विश्वात एकच ईश्वरी चैतन्य आहे हे भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतलले की मग विश्व कल्याणाची प्रार्थनाच मनातून बाहेर पडेल. अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन जगणे म्हणजेच भारतीय संस्कृती, असेही ते म्हणाले. (Avinash Dharmadhikari)
डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरूकुल या वैशिष्ट्यपूर्ण अशा बारा तासांच्या शाळेने या वर्षी दहा वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त बोडस कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योगासने, कथक, समूहगीत यांची प्रात्यक्षिके सादर केली. गुरूकुलाचे दैनंदिन वेळापत्रक तसेच नैमत्तिक कार्यक्रम याबाबत एक PPT सादरीकरण करण्यात आले. गुरूकुलातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. (Avinash Dharmadhikari)
(हेही वाचा – Dombivli : स्मार्ट मीटरला सोसायट्यांचा कडाडून विरोध; महावितरणविरोधात असंतोषाचा भडका)
कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाच्या कार्यवाह नितेश्री काबाडी यांनी केले. तर कोषाध्यक्ष राजेंद्र कामतेकर यांनी अविनाश धर्माधिकारी यांचा परिचय करून दिला. दशकपूर्ती निमित्त आलेल्या शुभेच्छापत्रांचे वाचन सह-कार्यवाह रूपाली साखरे यांनी केले. यावेळी लोकमान्य गुरूकुलच्या दहा वर्षांच्या कालावधीत कार्यरत असणाऱ्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या उपाध्यक्षा अर्चना जोशी यांनी त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. (Avinash Dharmadhikari)
तसेच गुरूकुलाच्या पहिल्या दिवसापासून सेवा देणाऱ्या कर्मचारी, प्रशिक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषण आशीर्वाद बोंद्रे यांनी केले, तर गुरूकुलच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण वन्दे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. या दशकपूर्ती कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, मंडळाचे सभासद, हितचिंतक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Avinash Dharmadhikari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
