Drip irrigation: सर्वसाधारणपणे पूर्वी जून महिन्यात पाऊस येणारच याची ठाम शाश्वती असायची, मात्र सद्यस्थितीत वाढते हवामान बदल, एल निनोचा धोका आणि हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेले विविध अंदाज यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मान्सून स्थिरावण्यास विलंब होत असल्याने खरीप हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच एल निनोच्या आगमनाबाबत येणारे विविध अंदाज, शेतकऱ्यांची काळजी वाढवणारे आहे. विहिरींना तळ गाठल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
घनसावंगी तालुक्यात यंदा मान्सूनच्या आगमनानंतर काही ठिकाणी किरकोळ सरी कोसळल्या. मात्र व्यापक पेरणीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पेरणीपासून दूर आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. शेतीच्या कामांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
हेही वाचा – NEET 2026 Exam: पुनर्परीक्षेपूर्वीच सर्व्हर क्रॅश, परीक्षेआधीच विद्यार्थ्यांची चिंता वाढली
सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी विहीर, बोअरवेल, आणि शेततळ्यातील उपलब्ध पाण्याच्या आधारे कपाशीची लागवड करत आहेत. विशेषत: ठिबक सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केली. पावसाची वाट पाहत बसल्यास लागवड उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, या भीतीने अनेकांनी हा पर्याय स्वीकारला आहे.
पिकांच्या वाढीसाठी नियमित पावसाची आवश्यकता
दरम्यान, कपाशीबरोबरच सोयाबीन, तूर, मूग, यांसारख्या इतर खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. अनेक शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाकडून पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत तालुक्यातील काही भागांत कपाशीची उगवणही सुरू झाली असून शेतांमध्ये हिरवळ दिसू लागली आहे. मात्र या पिकांच्या पुढील वाढीसाठी नियमित पावसाची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

