Abhijit Dipake Jaipur : कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण; Video व्हायरल

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

188
Abhijit Dipake during a protest in Jaipur.
Abhijit Dipake was attacked during a protest in Jaipur.

Abhijit Dipake Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूर येथे, कॉक्रोच जनता पार्टीचा (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दिपके याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके सध्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशव्यापी दौरा करत आहे. या मोहिमेअंतर्गत दिपके विविध राज्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

जयपूर दौऱ्यादरम्यान घडली घटना

याच पार्श्वभूमीवर, दिपके जयपूर दौऱ्यावर असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. रॅलीदरम्यान झालेल्या मारहाणीची काही दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये दिपके याच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास केला जात आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका

अभिजीत दिपकेने अलीकडच्या काळात झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली आहे.

दरम्यान, जयपूरमधील हल्ल्याच्या घटनेमुळे त्यांच्या भारत दौऱ्याची आणि नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.