Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे ‘हे’ आहेत प्लेइंग-11

155
Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे 'हे' आहेत प्लेइंग-11
Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे 'हे' आहेत प्लेइंग-11

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणाऱ्या टीमची नावे समोर आली आहेत. (Ind vs Afg) या सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्याची तब्येत आता बरी असला, तरी त्याला तंदुरुस्त व्हायला अजून वेळ लागेल. त्यामुळे इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरतील. या वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाले आहेत. (Ind vs Afg)

(हेही वाचा – Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई ‘या’ आतंकवाद्याकडे)

पहिल्या वर्ल्डकप सामन्यात खेळले, तेव्हा इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाले होते. आघाडीचे ३ फलंदाज शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र शून्यावर आऊट होऊनही या तिन्ही खेळाडूंच्या जागा निश्चित आहेत. विराट कोहली आणि केएल राहुल हे शेवटच्या सामन्याचे हिरो होते, त्यामुळे तेही असणारच आहेत. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजाही खेळताना दिसणार आहेत. भारतीय संघात एक बदल होताना दिसत आहे, तो म्हणजे रविचंद्रन अश्विनच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. अश्विन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चमकदार गोलंदाजी करू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कर्णधार आणि संघ व्यवस्थापन मोहम्मद शमीवर डाव खेळू शकतात.

अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज (Ind vs Afg)

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन

सेदिकुल्लाह अटल, मोहम्मद शाहज़ाद (विकेटकीपर), नूर अली, शाहिदुल्ला, अफसर जजई, करीम जनत, गुलाबदीन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अशरफ, फरीद अहमद, जहिर खान, कैस अहमद.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.