Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; २३६९ गावांमध्ये रणधुमाळी

119
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; २३६९ गावांमध्ये रणधुमाळी
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; २३६९ गावांमध्ये रणधुमाळी

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. (Gram Panchayat Election) राज्यातील तब्बल २,३६९ आणि जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. सरपंचपदासाठी थेट निवडणुका होणार असून त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होते आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर १० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता २३६९ गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. (Gram Panchayat Election)

(हेही वाचा – Israel Palestine Conflict : हल्ल्यातून बचावलेल्या इसमाने सांगितला ‘त्या’ भयावह घटनेचा क्रम)

राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता. ३०८० रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक देखील जाहीर झाली होती. निवडणूक जाहीर होताच संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र गुणवंत काळे यांनी या निवडणुकांना आव्हान दिले होते. त्यावर गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने आदेश राखीव ठेवला होता. तो १० ऑक्टोबर रोजी सुनावला. त्यानुसार, आगामी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून भविष्यात ही चूक सुधारण्यात यावी’, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.

ही चूक सुधारा – न्यायालय

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचपदासाठीचे आरक्षण निश्चित करताना आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने या आता निवडणुका घ्या; परंतु भविष्यात निवडणूक घेताना ही चूक सुधारा, असे आदेश पारित करत न्यायालयाने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. (Gram Panchayat Election)

नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतीमध्ये या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाद्वारे ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दिवाळीपूर्वी या निवडणुका होणार आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या, तरीसुद्धा आगामी लोकसभेपूर्वी या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

असा असेल ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे :१६ ते २० ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रांची छाननी : २३ ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक, चिन्ह वाटप : २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
मतदान : ५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
मतमोजणी: ०६ नोव्हेंबर २०२३

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ अन् ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल. (Gram Panchayat Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.