Love Jihad : इंदूरमध्ये विवाहित शाहरुख शेखने यश जैन सांगत जैन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केले लैंगिक अत्याचार

167
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शाहरुख शेख या मुसलमान व्यक्तीने एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या जैन युवतीला लव्ह जिहादमध्ये (Love Jihad) अडकवले. शाहरुख शेखने त्या युवतीला आपण यश जैन असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि मावशीच्या (आईच्या बहिणीच्या) घरी नियमितपणे तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, तिला संशय आल्यावर तिने वस्तुस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली, तेव्हा हा व्यक्ती मुसलमान आहे, शिवाय तो विवाहित असल्याचे तिला समजले.

लग्नाचे खोटे आमिष देवून केले बलात्कार

त्यानंतर त्या युवतीने चंदन नगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून तिला द्वारकापुरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. त्यानंतर एफआयआर दाखल केला आणि प्रकरण हिरानगर पोलिस ठाण्याकडे सोपवले कारण ही घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सुखलिया परिसरात घडली होती. पीडितेने आरोपीवर आपले नाव बदलून तिच्याशी मैत्री करणे, धार्मिक ओळखीबद्दल खोटे बोलणे आणि लग्नाच्या खोट्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्या युवकाचा फर्निचर बनवण्याच्या व्यवसायात आहे. सुमारे वर्षभरापूर्वी त्याची त्या पीडितेसोबत भेट झाली. द्वारकापुरी पोलिसांनी मुलीच्या वक्तव्याच्या आधारे मोहम्मद रईस यांचा मुलगा शाहरुख शेख याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि तत्काळ कारवाईसाठी हे प्रकरण हिरानगर पोलिसांना दिले. (Love Jihad)

अशी झाली फसवणूक 

पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी जेव्हा ही हे दोघे एकमेकांना भेटले तेव्हा त्याने स्वत:ची ओळख यश जैन म्हणून केली आणि त्यानंतर त्यांचे फोनवर चॅटिंग आणि संभाषण सुरू झाले. तो त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असल्याचा दावा करत होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता, असे सांगायचा. तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला डेट करायला सुरुवात केली. सुखलिया येथील त्याच्या मावशीच्या घरी हे दोघे भेटत होते. लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी ते तीन ते चार वेळा भेटले आणि त्याने तिचे लैंगिक शोषणही केले. 15 एप्रिल रोजी दुपारी तो तिला त्याच ठिकाणी घेऊन गेला. तो तिच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा तिला संशय आला. (Love Jihad) युवतीने शाहरुखची माहिती शोधली तेव्हा तो मुसलमान असल्याचे समजले. त्यानंतर त्या युवतीने त्या युवकाच्या कुटुंबीयांशी बोलणे केले. तेव्हा तिला त्या युवकाला आधीच एक पत्नी असल्याचे कळले आणि तिने तिच्या कुटुंबाला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर, तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन शाहरुखच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.