Mallikarjun Kharge यांच्या हिंदू धर्मविरोधी वक्तव्याचा पंतप्रधानांनंतर योगी आदित्यनाथ यांनी घेतला समाचार

123

छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा मतदारसंघातील प्रचार सभेत बोलतांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) पक्षाचे उमेदवार शिवकुमार दहरिया यांच्यासाठी मते मागताना म्हणाले की, त्यांचे नाव शिवकुमार आहे, ते रामाला बरोबरीने टक्कर देऊ शकतात. कारण ते शिव आहेत. माझे नावही मल्लिकार्जुन आहे, मी देखील शिव आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील भावनगर येथे एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले, काँग्रेसने हिंदूंच्या आस्थेत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी अत्यंत गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यांनी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्या संदर्भात अत्यंत खतरनाक वक्तव्य केले आहे. ते अत्यंत वाईट उद्देशाने केलेले विधान आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचा डाव आहे. ते राम भक्त आणि शिवभक्तांमध्ये भेद करत आहेत. त्यांच्यात भेद निर्माण करून भांडण लावण्याची त्यांची इच्छा आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली आपली महान परंपरा, राम असो, कृष्ण असो, शिव असो, जी मुघलांनाही तोडणं शक्य झालं नाही, ती मल्लिकार्जुन आणि काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी किती खाली जाणार? काँग्रेसवाल्यांनो ऐका, जो प्रभू रामचंद्रांना संपवण्यासाठी निघाला होता, त्याची काय अवस्था झाली?

(हेही वाचा चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच समजली; Sharad Pawar यांचा गौप्यस्फोट)

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  (Mallikarjun Kharge) यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले, काँग्रेस लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अत्यंत वाईट पद्धतीने पराभूत होत आहे आणि पराभवाचे हे दुःख काँग्रेस बहुसंख्यक हिंदू समाजाच्या आस्थेशी खेळून आणि अपमान करून व्यक्त करत आहे.’ एवढेच नाही तर, काँग्रेसचा इतिहास अशा कृत्यांनी भरलेला आहे. काँग्रेसचे वास्तविक रूप समोर येत आहे. भारताच्या सनातन परंपरेचा अपमान करणे, तिची बदनामी करणे, भारताच्या श्रद्धेशी खेळणे, ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे आणि काँग्रेस अध्यक्षांना काँग्रेसकडून जे संस्कार मिळाले आहेत, तसेच ते बोलत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.