Lok Sabha Election 2024 : भाजपाकडून उमेदवाराचे स्वागत; नाईक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार ?

एकीकडे हे नाराजीचे अंतर्गत राजकारण जरी सुरू असेल तरी, मनसे म्हणजेच राज ठाकरे हा घटक महत्वाचा ठरणार आहे.

109
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’

नुकतीच बहुप्रतिक्षित अशा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शेवटाच्या क्षणापर्यंत परिसर पिंजून काढणाऱ्या संजीव नाईक यांचा हिरमोड झाला आहे. नाईक समर्थक नाराज आहेत. मात्र; ही निवडणूक भाजपासाठी अती महत्वाची असल्याने साम, दाम, दंड, भेद या उक्तीनुसार नेत्यांना समर्थकांना नाराजी दूर करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. तसेच कडक निर्देश भाजपाकडून देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जुन्या भाजपाकडून उमेदवाराचे स्वागत करून पक्षाच्या निर्णयाचे आम्ही पाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी थेट लीड द्या व विधानसभेला उमेदवारी मिळवा, असे निर्देश भाजपातील कटकारस्थान करणाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात त्यानुसर युतीच्या उमेदवारांचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना कार्यकर्त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. खुद्द जिल्हाध्यक्ष संदिप नाईक यांनी कामगार दिनानिमित्त शहरात सर्वत्र बैठका घेत युतीचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे जुने कार्यकर्ते आपले काम ‘पक्ष तत्त्वानुसार’ करत आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी याआधीच सभांना सुरुवात केली असून, उमेदवार कोणीही असो, आम्ही युतीचे काम करणार असल्याची घोषणा त्यांनी याआधीच केली आहे. मतदानाच्या दिनी उमेदवारांपेक्षा मोदी की गांधी यावर मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – BMC : शोरमा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी, माजी नगरसेविकेचा व्हिडीओ व्हायरल)

शिवसेनेत आनंद

२०१९ च्या निवडणुकीत ऐरोली विधानसभेत गणेश नाईक यांचे कट्टर विरोधक विजय चौगुले यांनी युती धर्म पाळत गणेश नाईकांच्या खांद्याला खांदा लावत नाईक यांच्यासाठी प्रचार केला होता. यात सर्व नगरसेवक देखील सहभागी झाले होते. (Lok Sabha Election 2024)

त्यामुळे यंदा हाच युती धर्म खासदारकीला गणेश नाईक यांना पाळावा लागणार आहे. त्यानुसार समर्थकांना समजावे लागणार आहे. मतदान झाल्यावर मिळालेल्या मतांचा तपशील बूथ प्रमाणे ठेवला जाणार आहे. त्यानुसार विधानसभा तसेच पालिकेचे टिकीट वाटप करताना भाजपाकडून उमेदवारीचा विचार केला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)

मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक

एकीकडे हे नाराजीचे अंतर्गत राजकारण जरी सुरू असेल तरी, मनसे म्हणजेच राज ठाकरे हा घटक महत्वाचा ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मानणारा वर्ग आहे. जर राज ठाकरे यांच्यासभेमुळे मनसेच्या राजन विचारे यांनी १ लाख ३४ हजार मते घेतल्याने विजय चौगुले यांना पराभवाचा धक्का बसला होता. तर संजीव नाईक ५० हजार मतांनी विजयी झाले होते. सध्या राज ठाकरे यांनी महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज ठाकरे यांची सभा देखील ठाण्यात होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.