Road Side Drain : पेटीका नाल्यांमधील काढलेला गाळ सुकल्यानंतरही तिथेच, रस्त्यालगत लोकांकडून तुडवला जातो गाळ

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईचे कामही सुरु आहे.

508
BMC : मानखुर्दमधील फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त, केवळ १५ फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिका बसली गप्प

मुंबई महापालिकेच्यावतीने नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले असून मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह रस्त्या लगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढला जात आहे. मात्र, या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असला तरी काढलेला गाळ वेळीच उचलला जात नाही. परिणामी काढलेला गाळ सुकून रस्त्यावर इतरत्र पसरला जातो आणि तो सुकलेला चिखल पावडर स्वरुपात हवेत उडून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे धुळमुक्त मुंबईसाठी एकाबाजुला रस्ते धुतले जातात तर दुसरीकडे सुकलेला गाळाच्या मातीचा धुरळा उडत असल्याने प्रशासनाच्या स्वच्छते मोहिमेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. (Road Side Drain)

New Project 2024 05 02T214854.819

सुकलेल्या गाळाच्या मातीतील धुलीकरण हवेत

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईचे कामही सुरु आहे. मात्र, या नाल्यांबरोबरच रस्त्यालगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. अनेक महापालिका वॉर्डांमधील रस्त्यालगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. मात्र, हा काढण्यात आलेला गाळ ओला असल्याने काही दिवस तिथेच सुकत ठेवला जातो. पण हा गाळ सुकल्यानंतरही उचलला जात नाही. परिणामी सुकलेल्या गाळाची माती इतरत्र पसरुन त्यातील धुळीचे कण हवेसोबत पसरतात. (Road Side Drain)

New Project 2024 05 02T215002.557

(हेही वाचा – Mallikarjun Kharge यांच्या हिंदू धर्मविरोधी वक्तव्याचा पंतप्रधानांनंतर योगी आदित्यनाथ यांनी घेतला समाचार)

अंधेरीतील अपना बाजार ते आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानक परिसरातील गाळ तिथेच

पेटीका नाल्यामधील गाळ हा रासायनिक असल्याने सुकलेल्या गाळातील मातीच्या धुलीकणांमुळे लोकांना आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची भीती वर्तवली आहे. त्यामुळे हा गाळ त्वरीत उचलणे आवश्यक असतानाही कंत्राटदार हा काढून ठेवलेला गाळ उचलून नेत नाही. त्यामुळे बऱ्याचदा या चिखलातून लोकांना चालावे लागते आणि हा गाळ तुडवत नेला जात असल्याने प्रत्यक्षात नागरिकांना या चिखलामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. (Road Side Drain)

New Project 2024 05 02T215123.483

अंधेरी पश्चिम येथील अपना बाजार ते आझाद नगर मेट्रो रेल्वे च्या ५०० मीटरच्या क्षेत्रातच अनेक ठिकाणी अशाप्रकारे काढलेला गाळ सुकून गेल्यानंतरही तो उचलला गेला नाही. तसेच अन्य ठिकाणीही असेच पहायला मिळत आहे. (Road Side Drain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.