चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच समजली; Sharad Pawar यांचा गौप्यस्फोट

शरद पवार यांच्या सांगलीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सहमत असल्याचे सांगितले.

108

उबाठाने सांगलीच्या उमेदवारीबाबत गडबड केली की काय? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उबाठा या दोन पक्षांमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरून आधीच बराच काथ्याकूट झाला. असे असताना उबाठाने सांगलीत चंद्रहार पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी आम्हाला देखील टीव्हीवरुन समजली. आमच्यात उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केल्याने सांगलीतील उमेदवारी जाहीर होण्याबाबतचा वाद पुन्हा समोर आला आहे.

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन चांगलेच रणकंदन झाल्याचे पहायला मिळाले. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली आणि तेव्हापासून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील आक्रमक झाले, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले. त्यातच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगलीच्या उमेदवारीवरुन महत्त्वपूर्ण विधान करून नवीन ट्विस्ट निर्माण केला.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या तोंडून हिंदू शब्द नाहीसा झाला ; उपसभापती Neelam Gorhe यांचे टीकास्त्र )

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगलीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सहमत असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर का जाहीर केली? याबाबत आता पुन्हा चर्चा रंगली आहे. दरम्यान, विशाल पाटलांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. हायकमांडला याबाबतची संपूर्ण माहिती दिली असल्याचेही नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सांगलीतून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र, काँग्रेसकडून मनापासून प्रतिसाद प्रचारात मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शरद पवारांनी (Sharad Pawar) हे वक्तव्य करून ठाकरेंना एक प्रकारे धक्काच दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन देण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.