उद्धव ठाकरेंच्या तोंडून हिंदू शब्द नाहीसा झाला ; उपसभापती Neelam Gorhe यांचे टीकास्त्र 

भाजपाशी युती तोडून इंडी आघाडीसोबत हात मिळवणी केल्यानंतर हिंदू धर्माचा विसर पडला आहे की काय अशी शंका नागरिकांना वाटू लागली

145
उद्धव ठाकरेंच्या तोंडून हिंदू शब्द नाहीसा झाला ; उपसभापती Neelam Gorhe यांचे टीकास्त्र 

लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) निवडणुकीनची रणधुमाळी सुरू आहे, राज्यात २६ एप्रिल पर्यंत दोन टप्प्यातील लोकसभा निवडणूक पूर्ण झाले असून, येत्या १ जून पर्यंत तीनही टप्प्यातील निवडणूक पूर्ण होतील. तर उर्वरित तीन टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचारसभा सध्या सुरू असून, शिवसेनेच्या उपनेत्या व विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Legislative Assembly Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उलट एकनाथ शिंदेच (CM Eknath Shinde) बाळसाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. इंडी आघाडीसोबत (Indi Aaghaadi) हात मिळवणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या तोंडून हिंदू शब्द नाहीसा झाला आहे. असा टोला उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लगावला. (Neelam Gorhe)

(हेही वाचा – भारतीय शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून शिक्षण घेतलेले Pandit Vasantrao Deshpande)

हिंदू धर्माचा ठाकरेंना विसर ?

एकेकळी हिंदुत्वाचा राजकारण करून मत मागणारे उबाठा गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून काही दिवसांपासून हिंदुत्व शब्द नाहीसा झाला आहे. याउलट भाजपाशी युती तोडून इंडी आघाडीसोबत हात मिळवणी केल्यानंतर हिंदू धर्माचा विसर पडला आहे की काय अशी शंका नागरिकांना वाटू लागली आहे. तसेच कॉंग्रेसची भूमिका हिंदू विरोधी असून, उद्धव ठाकरेंसोबतचे काहीजण ठराविक व्यक्ती जातींना लक्ष करत आहेत. तसेच त्यांच्या राजकीय शिवराळ भाषेंमुळे मतदानाची टक्केवारी घसरत आहे, असे विधान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. (Neelam Gorhe)

(हेही वाचा – रेखाचित्रे आणि व्यंगचित्रांसाठी हटके शैली वापरणारे भारतीय व्यंगचित्रकार पद्मभुषण Mario Miranda)

दरम्यान, पुणे येथे नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) बोलत असताना, पुणे जिल्हयातील चार लोकसभा मतदारसंघातील महिलांसाठी शिवसेनेने मेळावा जाहीर केला आहे. हे मेळावे हडपसर येथील हांडेवाडी याठिकाणी ०३ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांचे प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी आले पाहिजे. महिलांचा सामाजिक आणि राजकीय सहभाग वाढवणे हा शिवसेनेचा (Shivsena) भर असेल, तर शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे पक्षात नाराज असून, त्यांच्याशी नीलम गोऱ्हे यांचे बोलणे झाले असून, ते महिला मेळाव्याची तयारी ते चांगल्या प्रकारे करत आहेत. पण त्यांच्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या योग्य नाहीत असे नीलम गोऱ्हे यांनी विधान केले.

शिवसेना पुणे शहराध्यक्ष मुख्यमंत्र्यांवर नाराज कारण काय ?

शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना नाराज भानगिरे (Nana Bhangire) यांना मुख्यमंत्र्यांकडून डावलले जात असल्याची भावना त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून पक्ष देखील सोडण्याच्या तयारीत असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात नुकतीच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा झाल्यावर नाना भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते, त्याकरिता जय्यत तयारी भानगिरे यांनी केली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी सदरचा बेत रद्द केल्याने भानगिरे नाराज झाले. तसेच यापूर्वी देखील नाना भानगिरे यांनी हडपसर येथे सेना कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री यांनी दांडी मारल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते.  (Neelam Gorhe)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.