PM Narendra Modi यांच्या दाव्याला मिळाला पुरावा; पाकिस्तानी सोशल मीडियातून राहुल गांधींचा होतोय उदोउदो

440
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील आणंद येथे प्रचारसभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत असताना काँग्रेस इथे मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवे आहे, जसे 2014 पूर्वीचे सरकार होते, असे सरकार ज्याच्या अंतर्गत मुंबईत दहशतवादी हल्ले शक्य होते. ज्या वर्षांमध्ये आपल्या देशात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात पाकिस्तान मोठा झाला होता. आता पाकिस्तानच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहे, आज भारतात काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याला काही तास उलटत नाही तोच पंतप्रधान मोदी यांचा दावा खरा ठरेल असे पुरावे समोर येऊ लागले आहेत.

पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर फवाद चौधरी अचानक चर्चेत आला आहे. व्हिडिओ री-शेअर करताना त्यांनी लिहिले की, राहुल ऑन फॉयर. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही विष फेकले आहे.
टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना रोखणे गरजेचे आहे. निवडणुकीदरम्यानचा राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करण्यामागचे कारण स्पष्ट करताना चौधरी म्हणाले, “जो कोणी अतिरेक्यांविरोधात बोलतो, त्याला माझा पाठिंबा आहे. मला वाटते की राहुल गांधींनी भारताची सध्याची परिस्थिती योग्य पद्धतीने मांडली आहे.
चौधरी पुढे म्हणाले, “अधिकारांचा मुद्दा सार्वत्रिक आहे. कोणी भारतात असो किंवा इतर कुठेही, त्याला योग्यच म्हणायला हवे, राहुल गांधींचे कौतुक करताना, राहुल यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दाखवून दिली.” भारत कसा वाढत आहे, गरीब माणसाला सध्याच्या भारतातून कसे बाहेर काढले आहे आणि फक्त तीन अब्जाधीश अतिरेकी यांना भारत विकत आहे, हे गांधी यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

सध्या पाकिस्तानी सोशल मीडियातील व्यासपीठावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उदोउदो करत आहेत आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची बदनामी करत आहेत. तसे ट्विट सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. पाकिस्तान मधील माजी मंत्री फवाद चौधरी यांनी राहुल ऑन फायर म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भाषणातून केलेल्या टीकेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानातील प्रसिद्ध वकील फवाद हुसेन यांनी ट्विट करून अधिक व्हायरल केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.