Police Constable च्या मृत्यू मागील गूढ वाढले; मृत्यूपूर्वी दिलेली जबानी आणि प्रत्यक्ष तपासात उघड झालेल्या माहितीत तफावत 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात विशाल पवार याने फटका गँग आणि विषारी इंजेक्शन ही कथा रचलेली असल्याच्या संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

360
Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?
Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?
  • संतोष वाघ 

मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विशाल पवार यांच्या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात विशाल पवार याने फटका गँग आणि विषारी इंजेक्शन ही कथा रचलेली असल्याच्या संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तपास पथकाच्या हाती सायन माटुंगा दरम्यान अशी घटना घडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाही. मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र विभागातील पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विशाल पवार (३०) यांचा बुधवारी ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पवार यांनी उपचार सुरू असताना कोपरी पोलीस ठाण्याला दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली होती. (Police Constable)

ट्रेनमधून प्रवासा दरम्यान रात्री ९:३० वाजता सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान फटका गँगने त्यांच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल फोन खाली पाडून मोबाईल घेऊन पळून जात असताना पवार यांनी रुळावर उडी टाकून त्यांचा पाठलाग केला असता फटका गँगच्या टोळीने त्यांना पकडून मारहाण केली व त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन देऊन त्यांना  लाल रंगाचे द्रव्य पाजले. त्यानंतर पवार यांची शुद्ध हरपली व ते रुळालगत मध्यरात्री १ वाजेपर्यंत पडून होते. त्यानंतर उठून माटुंगा रेल्वे स्थानक गाठले व सकाळी ट्रेन पकडून ११:३० वाजता ठाणे कोपरी येथे घरी गेले. पुढे त्यांना रात्री उलट्या सुरू झाल्या व त्यांचा चुलत भाऊ याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले, असा जबाब (Police Constable) विशाल पवार यांनी कोपरी पोलिसांना दिला. उपचार सुरू असताना बुधवारी विशाल पवार यांचा मृत्यू झाला. विशाल पवार या कॉन्स्टेबलच्या धक्कादायक मृत्यूमुळे संपूर्ण पोलीस दल हादरले व हे प्रकरण दादर रेल्वे पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात आले. दादर रेल्वे पोलिसांनी कोपरी पोलीस ठाण्याने घेतलेल्या गुन्ह्यात वाढ करून हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रेल्वे पोलिसांनी ६ पथके गठीत करण्यात आली, तसेच शहर पोलीसांची मदत घेण्यात आली. (Police Constable)

(हेही वाचा – Lok Sabha Election : उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर)

तपासात काय आले समोर?

तपास पथकाने ठाणे ते भायखळा या दरम्यानचे सर्व घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात विशाल हा माटुंगा रेल्वे स्थानकात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत कुठेच दिसुन येत नाही. तसेच पवार हा घटनेच्या रात्री दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर कैलास लस्सी या ठिकाणी रात्री ११:५६ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, तसेच ११:५६ ला त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी चुलत भावाला शेवटचा कॉल केला, त्यानंतर पवार यांचा मोबाईल फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी ते सकाळी ११ माटुंगा रेल्वे स्थानकावर ठाण्याच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडताना आढळून आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता पवार हे घराजवळील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. (Police Constable)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये पवार व्यवस्थित घरी जाताना दिसतात, तसेच घरी जाण्यापूर्वी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून भावाला फोन करून घरी येत असल्याचे कळवले होते. पोलिसांच्या तपासात असे आढळून येत आहे की, विशाल पवार हे घटनेच्या रात्री माटुंगा स्थानकात नव्हते व ते दादर रेल्वे स्थानकात रात्री ११:५६ वाजता सीसीटीव्हीमध्ये आढळून येत आहे, त्यांच्या मोबाईलवरून रात्री ११:५६ वाजता भावाला कॉल गेला याचा अर्थ रात्री ११:५६ पर्यंत पवार (Police Constable) यांच्याकडे त्यांचा मोबाईल फोन होता, मग त्यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी घटनेची वेळ रात्री ९:१५ ची दिली आहे, या दरम्यान त्यांचा मोबाईल फोन चोरीला गेला असे त्यांनी म्हटले परंतु पवार यांचा मोबाईल फोन रात्री ११:५६ त्याच्याकडे होता. पोलिसांचा एकंदर तपास आणि  विशाल पवार यांनी कोपरी पोलिसांना दिलेल्या जबाबात बरीच तफावत आढळून येत आहे. (Police Constable)

पवार यांनी कोपरी पोलीस ठाण्याला दिलेला जबाब हा रचलेली कथा असावी असा संशय तपास पोलीस पथकाला येत आहे. त्यांनी ही कथा का रचली? तसेच घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत नक्की काय झाले, त्यांची प्रकृती अचानक कशी बिघडली, आणि त्यात त्यांचा मृत्यू कशामुळे झाला या सर्व प्रश्नाची उत्तरे शवविच्छेदन अहवालानंतर समोर येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशाल पवार यांचे मृतदेहाचे शवविच्छेदन ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालय येथे करण्यात आले असून त्यांच्या मृत्यूचा अहवाल राखून ठेवण्यात आलेला आहे. (Police Constable)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.