Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई ‘या’ आतंकवाद्याकडे

76
Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई 'या' आतंकवाद्याकडे
Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई 'या' आतंकवाद्याकडे

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत किमान 900 इस्रायली ठार झाले आहेत, तर 2,616 हून अधिक जखमी झाले आहेत. (Israel-Palestine War) हमासने इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांसह 100 ते 150 लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांसह 700 हून अधिक लोकांना कंठस्नान घातले आहे. इस्रायलवर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यामागे मोहम्मद देईफ हा सूत्रधार असल्याचा इस्रायलचा विश्वास आहे. इस्रायलने मोहम्मद देईफला नवा ओसामा बिन लादेन म्हटले आहे. (Israel-Palestine War)

(हेही वाचा – Crime : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रगमाफिया ललित पाटीलच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी)

हमासचा हल्ला मोहम्मद देईफच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे इस्रायलचे मत आहे. असे म्हटले जाते की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने 58 वर्षीय मोहम्मद देईफला मारण्याचा ७ वेळा प्रयत्न केला; परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. मोसाद अनेक दशकांपासून मोहम्मद देईफचा शोध घेत आहे; पण प्रत्येक वेळी तो मोसादच्या जाळ्यातून निसटतो. वृत्तानुसार, मोहम्मद देईफ नेहमी व्हीलचेअरवर असतो आणि गाझामध्ये बांधलेल्या भूमीगत बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये तो राहतो. या बोगद्यांमुळे मोहम्मद देईफ प्रत्येक वेळी मोसादच्या हातातून निसटतो. (Israel-Palestine War)

हे बोगदे बांधण्यात मोहम्मद देईफ याचाही हात आहे. तो दररोज रात्री आपले स्थान बदलत राहतो आणि कधीही एका जागी थांबत नाही. इस्रायलकडे त्याचा एकच फोटो आहे. मोहम्मद देईफ याचा जन्म एका निर्वासित छावणीत झाला. त्याने आपले नावही बदलून ‘ देईफ’ म्हणजे अरबी भाषेत ‘पाहुणे’ असे ठेवले.

मोहम्मद देईफ याचा जन्म गाझा येथे 1965 साली झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद दीब इब्राहिम अल मसरी होते. मोहम्मद देईफ हा हमास या आतंकवादी संघटनेची लष्करी शाखा अल कासम ब्रिगेडचा कमांडर आहे. इस्त्रायली लोकांच्या हत्येचे आवाहन करणारे रेकॉर्ड केलेले संदेश तो हमासच्या सैनिकांना अनेकदा पाठवतो. मोहम्मद देईफ याने जगातील इतर देशांतील आपल्या समर्थकांना हमासमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक देशांतील नागरिक आतंकवादी कारवायांत अडकण्याचा धोका आहे. (Israel-Palestine War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.