Drama at Kusti Trials : विनेश फोगाटने अडवून धरली निवड चाचणी स्पर्धा

विनेश फोगाटने निवड चाचणी स्पर्धेची अंतिम फेरी थोडी उशिरा व्हावी यासाठी स्पर्धा अडवून धरली. 

115
Drama at Kusti Trials : विनेश फोगाटने अडवून धरली निवड चाचणी स्पर्धा
  • ऋजुता लुकतुके

काही महिन्यांपूर्वी आंदोलनाला बसलेली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) सोमवारी कुस्तीच्या निवड चाचणी स्पर्धेत महिलांची ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील स्पर्धा तिची अट मान्य होईपर्यंत रोखून धरली. ५३ किलो वजनी गटाची अंतिम फेरी पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी व्हावी अशी लेखी हमी तिला हवी. होती. अखेर तात्पुरत्या समितीने तिची मागणी मान्य केल्यावर ती ५० किलो वजनी गटात खेळली. (Drama at Kusti Trials)

इथं तिने प्रतिस्पर्धी शिवानीचा ११-६ ने पराभव केला. आणि पुढील महिन्यात बिश्केक इथं होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी तिने प्रवेश मिळवला. ५३ किलो वजनी गटात मात्र तिचा ०-१० असा पराभव झाला. तिच्याकडून तांत्रिक चुका झाल्या. आणि त्याच्या आधारावर प्रतिस्पर्धी अंजूला विजेती घोषित करण्यात आलं. कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि त्यामुळे त्यांच्या हकालपट्टी मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये विनेश आघाडीवर होती. सोमवारी विनेश (Vinesh Phogat) साई केंद्रात निवड चाचणीसाठी आली. तिने ५० किलो वजनी गटासाठी लढतही दिली. (Drama at Kusti Trials)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाला मुकणार)

यासाठी विनेशने मागितली लेखी हमी

पण, तिला ५३ किलो गटातही खेळायचं होतं. जागतिक संघटनेच्या नियमाप्रमाणे एक खेळाडू एका दिवशी एकाच वजनी गटात खेळू शकतो. असं असताना विनेशने दोन्ही गटातील लढतीत खेळण्याचा पवित्रा घेतला. २९ वर्षीय विनेश (Vinesh Phogat) ब्रिजभूषण यांच्या आंदोलनापूर्वी ५३ किलो गटात खेळत होती. पण, आंदोलनानंतर तिने वजनी गट बदलून ५० किलोचा केला. कारण, ५३ किलो गटात अंतिम पनगल आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. पण, विनेश आज स्पर्धेच्या ठिकाणी आल्यावर तिने दोन्ही गटांत खेळण्याची परवानगी मागितली. आणि ती खेळलीही. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर तिने ५३ किलो गटाची लढत आता न घेता पुढील तारखेला घेण्याची मागणी केली. शिवाय अंतिम निवड चाचणी स्पर्धा पुन्हा घेण्यात येणार याची लेखी हमी तिला हवी होती. (Drama at Kusti Trials)

५३ किलो गटांत अंतिम पनगळने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी कोटा हा देशाचा असतो. त्यामुळे कुस्तीचा कारभार हाकणाऱ्या तात्पुरत्या समितीने हे पूर्वीच स्पष्ट केलंय की, ५३ किलो गटातही निवड चाचणी स्पर्धा होईल. आणि या स्पर्धेतील विजेती अंतिम पनगळशी स्पर्धा करेल. आणि यातील विजेती खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. हे आधी जाहीर होऊनही विनेशला (Vinesh Phogat) तात्पुरती समिती किंवा नंतर आलेली कुस्ती फेडरेशन यात बदल करेल अशी भीती वाटत असावी. त्यामुळे तिने यासाठी लेखी हमी मागितली. आणि त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. (Drama at Kusti Trials)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.