Lok Sabha Election : भाजपाची दुसरी यादी तयार, अधिकृत घोषणा लवकरच; महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील २५ उमेदवारांची नावे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

180
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी आज मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचे नाव नव्हते. मात्र, आता दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील २५ उमेदवारांची नावे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यामध्ये नागपूरमधून केंद्रीय मंत्र नितीन गडकरी, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार तर जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे नाव घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीत ७ राज्यांतील उमेदवारांवर चर्चा झाली. सोमवारी रात्रीपर्यंत ही बैठक सुरू राहिली असून, जवळपास २० उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सूत्रांनी सांगितले की, नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाऊ शकते. (Lok Sabha Election)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामधील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. मात्र, बिहार, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये सुरू असलेल्या आघाडीच्या चर्चेमुळे या राज्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यास विलंब होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Lok Sabha Election) भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी दोन मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होऊ शकते. भाजपाने पहिल्या यादीमध्ये १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. (Lok Sabha Election)

महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये सध्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे. मात्र, यात महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी आज भाजपा मुख्यालयात बैठक होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे २३ उमेदवार निवडून आले होते. या २३ मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपाला पराभव पत्करावा लागलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघावर देखील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामुळे या जागांवर देखील उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बेशिस्त चालकांवर नजर ठेवणार विशेष आयटीएमएस यंत्रणा)

नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांची नावे

भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव सर्वांत आधी असण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच तसे संकेत दिले होते. तर बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भारती पवार तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.