Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बेशिस्त चालकांवर नजर ठेवणार विशेष आयटीएमएस यंत्रणा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले. वर्षभरात ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला. तसेच वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल टॅक्स वसूल करण्यात आला आहे.

97
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बेशिस्त चालकांवर नजर ठेवणार विशेष आयटीएमएस यंत्रणा

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून सतत तिथे होणाऱ्या अपघातामुळे वेगवेगळे वाद सुरु आहेत. डिसेंबर २०२२२ ते डिसेंबर २०२३ या वर्षभरातील आकडेवारीनुसार, या महामार्गावर आतापर्यंत ७३ अपघात झाले असून १४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर सर्वाधिक २० अपघात हे वाहनावरील नियंत्रणामुळे झाले आहेत. याचपार्श्वभूमिवर आता समृद्धी महामार्गावर बेशिस्त चालकांवर नजर ठेवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.

(हेही वाचा – दहशतवादी आणि गुंडांवर NIAची कारवाई; पंजाब-हरियाणासह राजस्थानमध्ये 30 ठिकाणी छापे)

महामार्गावर विशेष आयटीएमएस यंत्रणा उभारण्यात येणार :

समृद्धी महामार्गा (Samruddhi Mahamarg) हा ७०१ किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर २४ ठिकाणांवरुनच वाहनांना प्रवेश दिला जाईल. या मार्गावर दिलेली वेगमर्यादा १५० किलोमीटर प्रतितास आहे. फक्त सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यावर वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर आहे. वेगमर्यादा ठरलेली असताना ही यापेक्षा जास्त वेगाने वाहने येथून जाताना दिसतात. एवढंच नाही तर लेनची शिस्त देखील या महामार्गावर पाळली जात नाही. याच कारणामुळे अपघात येथे होतात. या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी यासोबतच महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ मदत पोहोचावी यासाठी विशेष आयटीएमएस यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Metro 1 : अनिल अंबानींकडून मेट्रो 1 खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी)

ITMS यंत्रणेची वैशिष्ट्ये :

– वाहन वेग दाखवणारी यंत्रणा प्रत्येक २० किमी अंतरावर असणार आहे.
– महामार्गावर दर १०० किमी अंतरावर ट्रॅफिक मॅनेजमेंट केंद्र असेल.
– प्रत्येक TMC वर २ ड्रोन यंत्रणा आणि हायवे पोलिसांसाठी २ स्पीड गन यंत्रणा आहेत
– बोगद्यात लेन कंट्रोल सिस्टम.
– प्रत्येक एंट्री, एक्झिट आणि बोगद्याच्या प्रवेशद्वारावर डिजिटल बोर्ड
– महामार्ग सहाय्यासाठी अत्यावश्यक कॉल बूथ असणार.
– आपत्कालीन संवादासाठी वायरलेस मोबाइल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम (Samruddhi Mahamarg)

(हेही वाचा – Hariyana : हरियाणा सरकार कोसळले; मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी दिला राजीनामा)

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या (Samruddhi Mahamarg) नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले. वर्षभरात ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला. तसेच वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपयांचा टोल टॅक्स वसूल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.