घटनेची मोडतोड करण्याचे काम नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात झाले ; Madhav Bhandari यांचा आरोप  

83
घटनेचे मोडतोड करण्याचे काम इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या काळात झाले ; Madhav Bhandari यांचा आरोप  

भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या. घटनेची चौकट बदलण्याचे आणि मोडतोड करण्याचे काम माजी पंतप्रधान पंडीत नेहरु (EX Prime Minister Pandit Nehru) यांच्या पासून ते इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या काळापर्यत झाले असल्याचा आरोप भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केला. महायुतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Madhav Bhandari)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम)

भारतीय जनता पक्ष राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार (false propaganda) काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसनेच मुळात घटनेची चौकट बदलली आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकारले. गेल्या ७४ वर्षांमध्ये १०५ वेळा घटनेमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ५६ वर्षे सत्तेत असणार्‍या काँग्रेसच्या काळात सर्वाधिक ७५ वेळा घटनादुरुस्ती (75 times constitutional amendment) झाली.  (Madhav Bhandari)

यापैकी पंडीत नेहरुजींच्या काळात १७ वेळा तर इंदिरा गांधी यांच्या काळात २९, राजीव गांधी यांच्या काळात १० वेळा अशा एकंदर ५६ घटना दुरुस्त्या नेहरु गांधीच्या परिवाराच्या काळात झाल्या. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात १० आणि मनमोहन सिंग यांच्या काळात ०६ घटना दुरुस्ती झाल्या असल्याचे भंडारी यांनी सांगितले. (Madhav Bhandari)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : शाहू महाराज स्वत:हून वारसदार म्हणवतात; राजवर्धनसिंह कदमबांडेंचं टीकास्र)

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Chief Atal Bihari Vajpayee) यांच्या काळात बहुतेक घटना दुरुस्त्या वेगवगेवळ्या सामाजिक आरक्षणाची व्याप्ती किंवा काळ मर्यादा वाढवणार्‍या होत्या. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देणारी ८६ वी दुरुस्ती आणि केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या नियंत्रित करणारी ९१ वी दुरुस्ती अशा दोन महत्वपूर्ण व परिणाम करणार्‍या घटनादुरुस्त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्या. 

शिक्षणाच्या अधिकारामुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार व्हायला गती मिळाली. मंत्र्यांच्या संख्येवर निर्बंध घातल्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार काही प्रमाणात तरी अटोपशीर झाला असल्याचे भंडारी म्हणाले. या सभेच्या वेळी महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, शाम सातपुते, पुष्कर तुळजापुरकर उपस्थित होेते.  (Madhav Bhandari)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.