Loksabha Election 2024 : शाहू महाराज स्वत:हून वारसदार म्हणवतात; राजवर्धनसिंह कदमबांडेंचं टीकास्र

कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. 

135
Loksabha Election 2024 : शाहू महाराज स्वत:हून वारसदार म्हणवतात; राजवर्धनसिंह कदमबांडेंचं टीकास्र

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती विरुद्ध भाजपाचे संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. शाहू महाराज छत्रपती थेट राजकारणात उतल्याने त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी संजय मंडलिक यांनी तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या, असा थेट सवाल शाहू महाराजांना विचारला होता. या वादात आता थेट शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी उडी घेतली आहे.(Loksabha Election 2024)

संजय मंडिलक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी राजवर्धनसिंह कदमबांडे हे धुळ्याहून कोल्हापुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी आताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत आणि ते स्वत:हून वारसदार म्हणवतात, असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Vande Metro: देशात लवकरच वंदे भारत मेट्रो सुरू करण्याची योजना, जुलैमध्ये होणार चाचणी; काय आहेत वैशिष्ट्ये?)

‘हे’ जनता ठरवेल…
राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी शाहू महाराजांचा रक्ता-मासाचा वारसदार आहे. कोल्हापुरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते. त्यामध्ये ज्यांना कोल्हापूरमध्ये दत्तक घेण्यासाठी जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही. ते स्वतःहून गादीचे वारसदार म्हणवतात; पण जनता ठरवेल की, गादीचे खरे वारसदार कोण आहेत. मी काही संपत्तीचा वारसदार नाही तर शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे, तसेच छत्रपती शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्यानंतर पद्मा राजे या वारसदार होत्या. पद्मा राजेंचा पुत्र म्हणून माझ्या त्या गादीवर हक्क होता. त्यामुळे मी छत्रपती शाहू महाराजांचा खरा वारसदार आहे, असा मी दावा करतो. असेही ते म्हणाले. (Loksabha Election 2024)

कोल्हापूरची जनता खरी वारसदार…
संजय मंडलिक म्हणाले, ”आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. तेसुद्धा दत्तकच आलेले आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला,” असं संजय मंडलिक म्हणाले होते.

कोण आहेत राजवर्धनसिंह कदमबांडे ?
राजवर्धनसिंह कदमबांडे हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. कदमबांडे यांनी १९८४ साली इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. कदमबांडे हे राजर्षी शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या सुकन्या पद्माराजे तथा बेबीराजे यांचे सुपुत्र आहेत. कोल्हापूरच्या राजकन्येचा सुपुत्र म्हणून राजवर्धनसिंह कदमबांडे यांची ओळख आहे.

कोल्हापूरच्या जनतेला आवाहन
कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना विविध विषयांवर भाष्य केले. तसेच महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला. “मी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे. मी छत्रपती शाहू यांचा रक्ताचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. १९६२ साली कोल्हापूरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते. आताचे छत्रपती शाहू हे खरे वारसदार नाहीत. ते स्वतःला गादीचे वारसदार म्हणत असले तरी खरा वारसदार कोण? हे जनता ठरवेल”,असे राजवर्धन कदमबांडे म्हणाले.

भाजप शाहू महाराजांच्या विचारांना मानणारा पक्ष 
भाजपाने तुम्हाला प्रचारासाठी का पाठविले? असा प्रश्न कदमबांडे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, हे पत्रकारानीच ठरविले आहे, मात्र भाजपाही शाहू महाराजांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. भाजपा शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.