Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग पाच दिवसांसाठी बंद; नेमकं कारण काय?

92
Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग पाच दिवसांसाठी बंद; नेमकं कारण काय?

येत्या काही दिवसांत तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Highway) प्रवास करणार असाल तर त्याआधी समृद्धी महामार्गावरील प्रवासाचे वेळापत्रक जाणून घ्या. कारण समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

अधिक माहितीनुसार, पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि हाय टेन्शन टॉवरच्या कामादरम्यान (Samruddhi Highway) जालना आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा मार्ग दोन्ही बाजूंनी तीन तासांसाठी पाच दिवस बंद असणार आहे. १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान, ई-वे दुपारी १२ ते दुपारी ३:३० दरम्यान बंद राहील. तसेच २५ ते २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली.

(हेही वाचा – Baby Crocodile In Swimming Pool : प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा नोंद करा; मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला व्हिडिओ)

या दिवसांमध्ये तुम्ही पर्यायी मार्गांचा वापर करू शकता.

नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज या पर्यायी (Samruddhi Highway) मार्गांचा अवलंब करता येणार आहे.

तसेच शिर्डीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या (Samruddhi Highway) वाहनांसाठी सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.