Samruddhi Express Highway : गौरी-गणपतीसाठी अमरावतीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

114
Samruddhi Express Highway : गौरी-गणपतीसाठी अमरावतीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्ग (Samruddhi Express Highway) सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही अपघात थांबत नाही. अशातच पुन्हा एकदा मंगळवारी (१९ सप्टेंबर) संध्याकाळी समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

अधिक माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक १६९ जवळ हा अपघात (Samruddhi Express Highway) घडला. समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला.

(हेही वाचा – Women’s Reservation Bill : आरक्षणातून महिलांना अधिकार मिळतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा)

आठ महिन्यांमध्ये ७०० हून अधिक अपघात

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Highway) अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे ७२९ अपघात झाले असून त्यापैकी ४७ अपघात जीवघेणे ठरले आहेत. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या “महामार्ग सुरक्षा” दलाने समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Highway) झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.