Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात २३.५ टक्के वाढ

109
Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात २३.५ टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भारत सरकारचे निव्वळ (Direct Tax Collection) प्रत्यक्ष कर संकलन ८,६५,११७ कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ७,००,४१६ कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. त्यातुलनेत यंदा सुमारे २३.५ टक्के अधिक असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली.

चालू आर्थिक वर्षात भारत सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन (Direct Tax Collection) आतापर्यंत १८.२९ टक्के झाले आहे. सरकारने सांगितले की, १ एप्रिल ते १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन ९,८७,०६१ कोटी रुपये होते. हा आकडा मागील वर्षी याच कालावधीत ८,३४,४६९ कोटी रुपये होता.करदात्यांना रिफंड देण्यापूर्वीच्या आकड्याला ग्रॉस डायरेक्ट टॅक्स कलेक्शन (Direct Tax Collection) म्हणतात. या आर्थिक वर्षात आतापर्यंत आगाऊ कर संकलन ३,५५,४८१ कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील २,९४,४३३ कोटी रुपयांपेक्षा सुमारे २०.७३ टक्के अधिक आहे.

(हेही वाचा – Samruddhi Express Highway : गौरी-गणपतीसाठी अमरावतीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी)

सरकारने सांगितले की, या आर्थिक वर्षात आतापर्यंत कॉर्पोरेट टॅक्स आणि वैयक्तिक आयकर दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. पर्सनल इन्कम टॅक्समध्ये (Direct Tax Collection) सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) देखील जोडण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन ४,१६,२१७ कोटी रुपये झाले आहे. तर निव्वळ वैयक्तिक आयकर संकलन आतापर्यंत ४,४७,२९१ कोटी रुपये झाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले की, सरकारने चालू आर्थिक वर्षात म्हणजे १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १,२१,९४४ कोटी रुपयांचा परतावा देखील जारी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.