Mahadev Betting App प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक!

119
Mahadev Betting App प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक!
Mahadev Betting App प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक!

ऑनलाइन महादेव बुक बेटिंग (Mahadev Betting App ) प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अभिनेता साहिल खानचा (Sahil Khan) अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी (२७ एप्रिल) फेटाळला होता. या प्रकरणावर न्यायालयाने म्हटले होते की, संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात मोठी रक्कम गुंतलेली आहे. (Mahadev Betting App )

अटकेतून दिलासा नाहीच

न्यायालयाने पुढे म्हटले की, या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरली गेली आहेत, त्यामुळे साहिल खानविरुद्ध (Sahil Khan) उपलब्ध पुरावे पाहता त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही. साहिल खानला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. (Mahadev Betting App )

(हेही वाचा –M. K. Madhavi Arrested: उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवकाला अटक)

साहिल खान Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप (Mahadev Betting App ) वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे. या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. तो (Sahil Khan) सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Mahadev Betting App )

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.