दाभोलकर कुटुंबियांवर तोंडे लपवण्याची वेळ; आता समोरासमोर चर्चेला येऊन दाखवा; अधिवक्ता Sanjeev Punalekar यांचे आव्हान

दाभोलकर कुटुंबीयांनी सीबीआयसोबत राहून हा खटला चालवला, दाभोलकर कुटुंबीयांचा वकील सीबीआयच्या वकिलाच्या बाजूला बसून युक्तिवाद करायचा. त्यात दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलाने सरकार पक्षाचे म्हणणे बरोबर आहे असे लेखी दिले, त्यामुळे हा असा निकाल लागलेला आहे. आज दाभोलकर कुटुंबीय पुन्हा म्हणतील सीबीआय चुकली, त्यांनी तपास बरोबर केला नाही, पण तसे नाही. काही लोकांना खोट्या आरोपाखाली गोवण्यासाठी त्यांचे तपास यंत्रणेसोबत हितसंबंध होते,  असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले.

453

आमच्या कार्यात खंड पडू शकणार नाही. आमच्याकडे मोठ्या संख्येने वकिलांचे संघटन निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही मागे जाणार नाही. ज्या केसेस आम्ही लढतोय ते लढतच राहणार आहोत. कोणतीही यंत्रणा आम्हाला घाबरवू शकणार नाही. तथाकथित पुरोगामी, डाव्या विचारांची मंडळी आहेत, जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात त्यांनी तर आमच्या वाट्याला येऊच नये, त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि आजसुद्धा त्यांची चर्चेची तयारी नाही. आज त्यांच्यावर तोंडे लपवण्याची वेळ आलेली आहे. अजूनही त्यांनी चर्चेला यावे, माझे त्यांना सरळ सरळ आव्हान आहे. पण त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, आजवर आम्ही सहन केले, आम्ही न्याय यंत्रणेचा मान राखला. आता तुम्ही तो राखावा अशी अपेक्षा आहे, असे आव्हान अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दाभोलकर हत्या प्रकरणात अंतिम निकाल दिला. त्यामध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकर, डॉ. वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदू जनजागृती समितीच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी अधिवक्ता पुनाळेकर (Sanjeev Punalekar) बोलत होते.

अटकेचा कट रचला

ठाणे बॉम्बस्फोट, मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ज्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवण्यात आले होते, त्यांना आम्ही निर्दोष मुक्त केले. मालेगाव बॉम्बस्फोटाचा जो खटला चालला त्यातील तीन आरोपींचा मी वकील होतो, त्यांची निर्दोष मुक्तता झाली. यात बऱ्याच एटीएस अधिकाऱ्यांची नावे आली, त्यात सुनील माने यांचे नाव होते, आज ते स्वतः स्फोटकांप्रकरणी तुरुंगात आहेत. परमवीर सिंग यांच्या सारख्यांचे काय झाले हे आपण पाहिले. सोराबुद्दीन प्रकरण असो किंवा पद्मसिंह पाटलांवर जे पवनसिंग निंबाळकर यांच्या खुनाचे आरोप होते त्यामध्येही मी वकील होतो. त्यातील काही लोक दाभोलकर प्रकरणात तपासात होते. त्यांनी या तपासात समांतर तपास करून हस्तक्षेप केला, त्यात खोटे पुरावे तयार करण्यात आले. त्यातील काही मटेरियल आणि पुरावे आम्ही न्यायालयासमोर आणले त्याला कोणतेही उत्तर सीबीआय देऊ शकलेली नाही. मी लढवलेल्या या खटल्यांमध्ये काही जण दुखावले होते, अशी सर्व मंडळी एकत्र आले आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांनी त्यांना साथ दिली. त्यांचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांची माध्यमांमध्ये आणि न्यायालयांमध्ये बाजू घेतली. त्यातून आपल्यावर अटकेचा कट रचण्यात आला होता, असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

(हेही वाचा Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)

दाभोलकर कुटुंबियांनी तपास यंत्रणेचा वापर केला 

जी याचिका दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आली होती, त्यावेळी पोलिसांवर टीका होत होती, मात्र त्या याचिकेतून पोलिसांवर कुठेही आरोप होऊ नयेत असाच त्यामागे उद्देश होता. त्यात त्यांनी विशिष्ट व्यक्ती, संघटनेच्या विरोधात प्रश्न विचारले जावेत, असा त्यांचा या याचिकेच्या मागे प्रयत्न होता. अशा प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग दाभोलकर कुटुंबीयांनी केला आहे, असे दिसते. ही मंडळी विचाराने फॅसिस्ट आहेत, त्यांनी कधी परमवीर सिंग त्यांच्या सारख्या व्यक्तींना विरोध केला नाही, न्याययंत्रणेमध्ये काही दोष आहेत त्याही विरोधात ते कधी उभे राहिले नाहीत. दाभोलकर यांची संघटना जी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करते असे सांगते. त्यांच्या अंधश्रद्धे निर्मूलनाच्या व्यासपीठावर सगळे सिनेकलाकार दिसतात, पण त्यांच्याच व्यसनमुक्तीच्या कामात एकही सिने कलाकार येत नाही. हा एक प्रकारचा ढोंगीपणा आहे, हे त्यांचे मार्केटिंग आहे आणि या त्यांच्या विचारसरणीला कुणी विरोध केला, तर त्याला विरोध करायचा, त्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करून घ्यायचा, हा सगळा धुर्तपणा आहे. दाभोलकर प्रकरणात न्यायालयात साक्ष सुरु असताना एका व्यक्तीने बोट दाखवून सांगितले की समोरची व्यक्ती माझ्या घरी येऊन मला साक्ष कशी द्यायची हे सांगायची. तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीने न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला धरून आणले, ती व्यक्त अंनिसची सचिव निघाली. या सगळ्या गोष्टी न्यायमूर्तीने नमूद केल्या आहेत. तरीही याची दाभोलकर कुटुंबियांना कधी भीती वाटली नाही, कारण त्यांची यंत्रणासोबत हातमिळवणी झालेली होती. कशाही प्रकारे तपास भरकटवायचा हा त्यांचा हेतू होता, हे यातून स्पष्ट होते, असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

मुक्ता दाभोलकर यांनी पळ काढला 

एक व्यक्ती मरण पावते ही दुर्दैवी बाबी आहे. पण त्या मृत व्यक्तीच्या नावाने कुठून कुठून घटना उभ्या केल्या जात होत्या, वकील आणले जात होते. कोर्टात लढाया लढल्या जात होत्या, ठिकठिकाणी आंदोलने केली जात होती. पण प्रत्यक्ष न्यायालयात जेव्हा साक्ष द्यायची वेळ येते तेव्हा मात्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर साक्ष देण्यास नकार देते. एखादी मुलगी बाप मेल्यावर न्यायालयात साक्ष देण्यास कशी नाकारू शकते, हेच कळत नाही. याउलट त्यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वारंवार याचिका केल्या पण जिथे उलट तपासणीची वेळ आली तेव्हा त्यापासून पळ काढला. हमीद दाभोलकर यांना उलट तपासणीत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंबंधी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, मला काही माहित नाही. आमच्या वकिलाने ते लिहिलेले आहे, आमच्याकडे काही पुरावे नाहीत, अशी उत्तरे दिली आहेत. म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती, त्यात सगळे खोटे लिहिले होते का, याची उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहेत. माझे दाभोलकर कुटुंबियांना आव्हान आहे, त्यांनी माझ्यासमोर बसावे, यावर खुली चर्चा व्हायला पाहिजे, यापासून पळू नका,  असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

(हेही वाचा Dabholkar Murder Case प्रकरणातील निकालामुळे हिंदू दहशतवादचे नेरेटिव्ह सेट करण्याचे षडयंत्र उध्वस्त झाले; अभय वर्तकांचा घणाघात)

सीबीआयच्या अधिकाऱ्यांना माज होता

सीबीआयचे वरिष्ठ तपास अधिकारी एस.आर. सिंग यांची या प्रकरणात अत्यंत अन्यायाची भूमिका होती. ते देखील आमच्या विरोधात काही करू शकले नाही. कळसकरची माझी भेट झाली होती का, हे ते सहज शोधू शकले असते, कारण आमच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही आहेत. कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही आहेत. ते तपासू शकले असते, कळसकरलाही त्यांनी प्रश्न विचारले आहेत. तरीही सीबीआयने सांगितले, आम्ही हे काही तपासले नाही. वस्तुस्थिती अशी अजिबात नाही, सीबीआयने हे सर्व सीसीटीव्ही तपासले होते, पण त्यांना त्यात काहीही मिळाले नव्हते, म्हणून ते न्यायालयासमोर सादर करू शकले नाही. सीबीआयचा तपास अतिशय भरकटलेला होता. त्यांनी सुरुवातीला रुद्रा पाटीलचे नाव घेतले, तो निर्दोष आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे घेतली. तेही निर्दोष आहेत. अगदी सुरुवातीला खंडेलवाल आणि नागोरीचे नाव घेतले, तेही निर्दोष आहेत. मग त्यांनी कळसकर आणि अंदुरे यांची नवे घेतली आणि त्यातही त्यांनी घोळ घातला. अशा प्रकारे दाभोलकर प्रकरणात दाभोलकर कुटुंबीय ज्यांची ज्यांची नावे घ्यायची, त्यांना त्यांना तपास अधिकारी आरोपी बनवायचे, हे अत्यंत चुकीचे होते, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना माज होता आणि त्यांच्याकडे जी पदे आहेत त्याचा ती मंडळी दुरुपयोग करायचे,  असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

खाणीतून पिस्तूल शोधण्यात ८ कोटींचा भ्रष्टाचार 

शरद कळसकर याला जेव्हा पकडले तेव्हा त्याच्याकडे ५-६ पिस्तुले आणि बॉम्ब सापडल्याचा दावा सीबीआयने केला, त्याच वेळी दाभोलकर कुटुंबियांनी एक याचिका केली होती.  त्यामध्ये मात्र दाभोलकर कुटुंबियांनी ती पिस्तुले खरेच सापडली का किंवा त्यातील एखाद्या पिस्तुलाने दाभोलकरांची हत्या केली का, असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्या पिस्तुलांचा पुढे काहीच तपास झाला नाही, हे दाभोलकर कुटुंबियांना मान्य होते. कारण त्यांचा त्याच्याही काही संबंधच नव्हता. पुढे दाभोलकर यांची हत्या केलेले पिस्तूल एका खाणीत टाकले. असा एक जबाब सीबीआयने दाखवला, जो जबाब शरद कळसकर याने कधी दिलाच नाही, शरद कळसकर याला जेव्हा कर्नाटकातून मुंबईत आणले तेव्हा त्याने मुंबईतील एटीएसच्या विशेष न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितले की, माझ्या ठिकठिकाणी जबरदस्तीने सह्या घेतल्या, मी असा कुठलाही जबाब दिलेला नाही. तसे शपथपत्र दिले. पुढे जेव्हा हे प्रकरण न्यायालयात आले, तेव्हा तो जबाब कायद्याच्या कसोटीत टिकणारा नव्हता, म्हणून सीबीआयने तो जबाब न्यायालयासमोर आणला नाही. तरीही त्यांनी मला अटक केली. दुसरीकडे अंदुरे नावाचा आरोपी आहे. त्याला पकडले त्याच्याकडेही पिस्तूल मिळाल्याचे सीबीआयने सांगितले. म्हणजे एक मागोमाग एक व्यक्ती पकडून त्यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण करण्यात आले. त्यानंतर नसलेले पिस्तूल खाणीतून शोधण्यासाठी सीबीआयने एका परदेशी कंपनीला कंत्राट दिले. यासाठी ८ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्यात आला. तो खर्च कुणी, कसा केला हे कुणालाही माहित नाही. पण यात गंमतीदार गोष्ट अशी आहे, सीबीआयने शपथेवर सांगितले की, ८ कोटी खर्च झाले, खाण खोदली, पण पिस्तूल मिळाले कि नाही हा अहवालच त्या परदेशी कंपनीने दिला नाही. एका परदेशी कंपनीला आपण पिस्तूल खाणीतून शोधण्यासाठी ८ कोटी देतो, त्याचा ती कंपनी अहवालच देत नाही, हे अत्यंत संशयास्पद आहे, हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. अशी आमची मागणी आहे, असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

(हेही वाचा Dabholkar Murder Case : … त्यामुळेच तपास भरकटला; अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांची स्पष्टोक्ती)

दाभोलकर कुटुंबियांचे सीबीआयशी हितसंबंध 

माझ्यावर जो खटला चालवला, दहशतवादी म्हणून दोषारोप केले, त्यामधून न्यायालयाने आम्हाला निर्दोष सोडले. कोर्टाने सीबीआयला पुरावे सादर करण्यास सांगितले होते, पण सीबीआयने आम्ही पुरावे सादर करू इच्छित नाही असे सांगितले. दाभोलकर कुटुंबाचे वकीलही त्या ठिकाणी होते, पण त्यांनीही ते पुरावे सादर करण्याची मागणी सीबीआयकडे केलेली नाही. दाभोलकर कुटुंबीयांनी सीबीआयसोबत राहून हा खटला चालवला, दाभोलकर कुटुंबीयांचा वकील सीबीआयच्या वकिलाच्या बाजूला बसून युक्तिवाद करायचा. त्यात दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलाने सरकार पक्षाचे म्हणणे बरोबर आहे असे लेखी दिले, त्यामुळे हा असा निकाल लागलेला आहे. आज दाभोलकर कुटुंबीय पुन्हा म्हणतील सीबीआय चुकली, त्यांनी तपास बरोबर केला नाही, पण तसे नाही. काही लोकांना खोट्या आरोपाखाली गोवण्यासाठी त्यांचे तपास यंत्रणेसोबत हितसंबंध होते,  असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर(Sanjeev Punalekar) म्हणाले.

 अटकेची उरलीसुरली भीती नष्ट झाली 

१३ दिवस सीबीआयच्या कोठडीत आणि २९ दिवस येरवडा कारागृहातील फाशीच्या कोठडीत मला ठेवले, जिथे नक्षलवादी आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपींना ठेवले होते. मला त्या कोठडीत कुणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आले हे मला माहित नाही, पण तुरुंग प्रशासनाच्या या निर्णयाच्या व्यतिरिक्त मला कोणताही त्रास त्यांना दिला नाही. त्याठिकाणी राहून मला बरेच काही शिकता आले. तसेच तुरुंगाविषयी मध्यमवर्गीयांच्या मनामध्ये जे काही भय असते ते माझ्याही मनात होते, पण तेही उरलेसुरले भय नष्ट झाले. ईश्वरावरील विश्वास वृध्दिगंत झाला. पूर्ण न्याय अद्याप झाला नाही. प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ज्यांनी या प्रकरणात अन्यायाची भूमिका घेतली त्यांच्या विरोधात कारवाईसाठी कार्य पुढे सुरु ठेवावे लागेल, असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

(हेही वाचा Dabholkar Murder Case : ३ जण निर्दोष मुक्त होणे, हा विजयच; अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची भावना)

कळसकरसाठी वकिली करणारच  

मला सीबीआयने अटक केली तेव्हा ते माझ्या मनातील दृढ निश्चियी बुद्धाची धक्का पोहचू शकले नाही. उलट सीबीआय माझी उलट तपासणी घेत होती तेव्हा मला जे प्रश्न विचाराचे त्याची उत्तरे देताना सीबीआयचे अधिकारीच मला थांबवायचे, त्यांना ते ऐकूनच घ्यायची इच्छा नसायची. त्यांनी ज्या कळसकरप्रकरणी मला अटक केली, त्या कळसकरचे नालासोपारा स्फोटके प्रकरणात वकीलपत्र माझ्याकडे आहे. दाभोलकर प्रकरणातील कळसकरचे वकीलपत्र नाईलाजास्तव मला सोडावे लागले, कारण एका प्रकरणातील एक आरोपी सह आरोपीचे वकीलपत्र घेऊ शकत नाही, पण नालासोपारा प्रकरणात मी कळसकर याचा वकील आजही आहे आणि या प्रकरणातील काही जणांना आम्ही जमीन मिळवून दिलेला आहे. यंत्रणांना त्यांना जे काही करायचे आहे ते करावे, अटकेची जी काही उरली सुरली भीती आहे ती निघून गेलेली आहे. मला यंत्रणा घाबरवू शकत नाही,  से अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.