Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी

148
Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी
Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा (Dabholkar murder case) निकाल शुक्रवार, १० मे रोजी पुणे न्यायालयात न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दिला. या प्रकरणात ज्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप होता ते डॉ. वीरेंद्र तावडे आणि आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेले ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवण्यात आले. मात्र शरद कळसकर आणि सचिन अंधुरे या दोघांना त्यांनीच हत्या केल्याचा आरोप करत त्यांना सश्रम कारावासाची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच ५ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

तपास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
या प्रकरणात न्यायाधीशांनी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कायद्याअंतर्गत लावलेले कलम रद्द केले. दोषींना 302 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. न्यायाधीश जाधव यांनी निकाल सुनावत असताना तपास अधिकारी यांना कडक शब्दांत सुनावले. Dabholkar murder case या प्रकरणात सक्षम तपास अधिकारी यांनी सक्षमपणे पुरावे सादर करण्यात निष्काळजीपणा केला, असे न्यायालयाने म्हटले.

(हेही पहा – IPL 2024, RCB vs PBKS : बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय  )

वीरेंद्र तावडे, पुनाळेकर आणि भावे का झाले निर्दोष?
यावेळी न्यायाधीश जाधव यांनी डॉ. तावडे यांच्यावर हत्येचा प्रत्यक्ष कट रचल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांच्यावर संशयाला वाव आहे; परंतु त्यांच्या विरोधात तपास अधिकारी सबळ पुरावे सादर करू शकले नाही म्हणून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे, असे म्हणाले.

त्याच बरोबर Dabholkar murder case प्रकरणात ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे म्हटले.

आरोपींच्या वकिलांवर ताशेरे
दरम्यान हा निकाल देताना न्यायाधीश जाधव यांनी आरोपींच्या वकीलांवरही ताशेरे ओढले. कुणाचीही हत्या होणे ही दुर्दैवी बाब आहे. आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणी करताना आरोपीचे समर्थन करताना खुनाचे समर्थन केले हे खेदजनक होते, असेही न्यायधीश जाधव म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.