Lok Sabha Election : मुंबई-पुणेकरांनी आदिवासींकडून ‘हे’ जरूर शिकावे

गेल्या महिनाभरात राज्यातील आदिवासी समाजाने देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात जो सहभाग घेतला, तो प्रशंसनीयच आहे.

156
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे सप्टेंबरमध्ये वाजणार बिगुल ?
  • सुजित महामुलकर

मुंबईकर स्वतःला सुशिक्षित आणि हुशार समजत असले तरी त्यांनी एक गोष्ट आदिवासी समाजाकडून शिकणे खरंच गरजेचे आहे. गेल्या महिनाभरात राज्यातील आदिवासी समाजाने देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात जो सहभाग घेतला, तो प्रशंसनीयच आहे. (Lok Sabha Election)

मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा अधिक मतदान

लोकसभा २०२४ निवडणुकीत आदिवासीबहुल, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघांत मुंबई, पुणे, नागपूर अशा राज्यातील प्रगत समजल्या जाणाऱ्या शहरांपेक्षाच नाही तर अन्य कोणत्याही मतदार संघांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. मतदानाबाबत आदिवासी समाजात असलेली जागृती पुणे-मुंबईकरांमध्ये नाही, हे यावरून दिसून आले. (Lok Sabha Election)

पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आदिवासी मतदार संघ

आज २० मे ला पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात १३ मतदार संघांपैकी दोन मतदार संघ पालघर आणि दिंडोरी हे अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी) राखीव आहेत. या मतदार संघात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले. या टप्प्यातील सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदार संघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५७.०६ टक्के तर पालघरमध्ये ५४.३२ टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगांवर भाजपाही नाराज; मतदारांचे हाल दुर्दैवी, Pravin Darekar काय म्हणाले? वाचा सविस्तर…)

विधानसभा क्षेत्रातही आदिवासीच आघाडीवर

विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कळवण विधानसभा क्षेत्रात ६२.२८ टक्के आणि दिंडोरी विधानसभा क्षेत्रात ६२.०३ टक्के मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झाले. त्याचप्रमाणे पालघर लोकसभा मतदार संघातील डहाणू या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा क्षेत्रातही ६२.३८ टक्के आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ६२.७० टक्के मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाल्याची नोंद केली गेली. हे मतदानही अन्य विधानसभा क्षेत्रांमध्ये सरस आहे. (Lok Sabha Election)

लोकसंख्याही मुंबईपेक्षा अधिक

पालघर आणि दिंडोरी या लोकसभा मतदार संघांत लोकसंख्या कमी असेल म्हणून मतदानाची टक्केवारी अधिक दिसून येते, अशी शंका येऊ शकते. पण तसे काहीही नाही. या दोन्ही मतदार संघात असलेली मतदार संख्या मुंबईतील मतदार संघांपेक्षाही अधिक आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांतील मुंबई उत्तर या मतदार संघात सर्वाधिक म्हणजे १८.११ लाख मतदार आहेत तर सगळ्यात कमी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात १४.७४ लाख मतदार संख्या आहे. या तुलनेत पालघर मतदार संघात अधिक म्हणजे २१.४८ लाख आणि दिंडोरी मतदार संघात १८.५३ लाख मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.