Dabholkar Murder Case प्रकरणातील निकालामुळे हिंदू दहशतवादचे नेरेटिव्ह सेट करण्याचे षडयंत्र उध्वस्त झाले; अभय वर्तकांचा घणाघात

149
Dabholkar Murder Case प्रकरणातील निकालामुळे हिंदू दहशतवादचे नेरेटिव्ह सेट करण्याचे षडयंत्र उध्वस्त झाले; अभय वर्तकांचा घणाघात

११ वर्षानंतरच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाभोलकर हत्या प्रकरणाचा (Dabholkar Murder Case) निकाल लागला आहे. ज्यात हिंदुत्व संघटनाचे मोठे कार्य केलेले डॉ. वीरेंद्र तावडे, तसेच बिनबुडाच्या आरोपाखाली अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची न्यायालयात बाजू मांडणारे ऍड. संजीव पुनाळेकर आणि ज्यांनी ५ हजाराहून अधिक माहितीचे अधिकाराचे अर्ज करून माहितीच्या अधिकार क्षेत्रात भरीव कार्य केलेले विक्रम भावे या तिघांना निर्दोष मुक्त केले. या कालावधीत डॉ. तावडे मागील ८ वर्षे तुरुंगात राहिले, त्यांच्या वडिलांचे निधन झाले तरी ते वडिलांना पाहू शकले नाही. त्यांचे आयुष्य बरबाद झाले. विक्रम भावे दोन वर्षे तुरुंगात होते, या दोघांच्या आयुष्याची ही भरपाई कशी होणार? ऍड. संजीव पुनाळेकर यांची प्रतिमा खराब करण्यात आली, त्यांची भरपाई कोण करणार? हे सर्व होण्यामागील कारणीभूत मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर आहेत. त्यांनी तपास यंत्रणांवर दबाव टाकून तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचे होते. केवळ हिंदू दहशतवाद हे नेरेटीव्ह सेट करण्याचा हे षडयंत्र रचले होते, जे या निकालामुळे ध्वस्त झाले आहे, असे मत सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी मांडले. (Dabholkar Murder Case)

पुणे विशेष न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणाचा (Dabholkar Murder Case) निकाल लागल्यावर सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट उपस्थित होते. हिंदू दहशतवाद हे नेरेटीव्ह सेट करण्यासाठी मुक्ता दाभोलकर यांचा ज्या डाव्या इको सिस्टीमवर फाजील आत्मविश्वास होता, त्यांचा या निकालामुळे पराभव झाला आहे. हा तपास संशयास्पद आहे. निकाल देताना न्यायालयाने UAPA कायद्याचे कलम रद्द केले. ज्या आधारे हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याचा खटाटोप करण्यात आला होता, असेही वर्तक म्हणाले. (Dabholkar Murder Case)

New Project 2024 05 10T163329.353

पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम तपास भरकटवला

२० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर यांची हत्या (Dabholkar Murder Case) झाली. त्यानंतर अवघ्या दीड तासात त्यावेळीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या खूनामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे, असे म्हणत पहिल्यांदा हा तपास भरकटवला. वस्तुतः या खुनाच्या नंतर शस्त्र तस्कर नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून जप्त केलेले पिस्तूल त्याच्या गोळ्या आणि दाभोलकर यांच्या शरीरात सापडलेल्या बंदुकीच्या गोळ्या एकच आहेत हे न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तपासणीत सिद्ध झाले होते, असे वर्तक म्हणाले. (Dabholkar Murder Case)

खुनाची कबुली दिलेल्या रसूल अन्सारीचा जबाब कुठे गेला?

त्याच कटातील दोन आरोपी मंगेश चौधरी आणि रसूल अन्सारी या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली, तिथे त्यांनी आम्हीच दाभोलकरांचा खून केला, अशी कबुली दिली. मग त्या दोघांना गोव्यावरून मुंबईला आणल्यावर कबुली जबाब कसा बदलला? तो कबुलीजबाब कुठे गेला? तो का गायब करण्यात आला? कारण जर रसूल अन्सारी यात सापडला तर हिंदू दहशतवाद हे नेरेटिव्ह सेट करता येणार नव्हते, सनातन संस्थेला गोवता आले नसते. म्हणून हा तपास भरकटवण्यात आला, असेही वर्तक म्हणाले. (Dabholkar Murder Case)

(हेही वाचा – Akshaya Tritiya 2024: बदलत्या हवामानाचा परिणाम; अक्षय्य तृतीयालाच ‘आंबा’ रूसला)

New Project 2024 05 10T163432.674

मुक्ता दाभोलकर विनय पवार, सारंग अकोलकर यांची क्षमायाचना करणार का?

यानंतर सनातन संस्थेची कसून तपासणी करण्यात आली, आश्रमांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. १६०० साधकांची चौकशी करण्यात आली, बँक अकाऊंट तपासण्यात आले, यातून काहीच सापडले नाही. केवळ मुक्त दाभोलकर यांच्या सवंग प्रसिद्धीचा हव्यास आणि डाव्या इको सिस्टिमवरील फाजील आत्मविश्वास यामुळे या प्रकरणाचा चुकीच्या दिशेने तपास झाला. या प्रकरणात (Dabholkar Murder Case) नागोरी आणि खंडेलवाल यांच्या नंतर विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांना आरोपी ठरवण्यात आले, ते फरार आहेत. त्या दोघांना पकडून द्यावे म्हणून मुक्ता दाभोलकर यांनी स्व खर्चाने फोटो काढून नाक्या नाक्यावर त्यांचे फोटो लावले , त्यावेळी त्यांच्या पालकांना काय वाटले असेल. आज जेव्हा या प्रकरणाचा निकाल लागला तेव्हा त्यात या दोघांचा उल्लेखच नाही. मग मुक्ता दाभोलकर या आता त्याच विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचे फोटो नाक्यावर लावून त्यांच्यासमोर क्षमा याचना करणार का?, असेही वर्तक म्हणाले. (Dabholkar Murder Case)

मुक्ता दाभोलकरांमुळे खटला रखडला

हा तपास सुरु असताना अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख हे साक्षीदारांना भेटत होते, हे कायद्याने चुकीचे होते. या प्रकरणी (Dabholkar Murder Case) देशमुख यांना अटक केली पाहिजे. या हत्येप्रकरणी २०१६ मध्ये डॉ. तावडेंना अटक झाली, त्यानंतर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. खरेतर त्याच वेळी हा खटला सुरु होणे अपेक्षित होते. पण मुक्ता दाभोलकर यांनी हा खटला सुरु करू नये अशी मागणी उच्च न्यायालयात जाऊन केली आणि सात वर्षे खटला सुरूच झाला नाही. जर त्यावेळी खटला सुरु झाला असता तर डॉ. तावडे २०१८मध्ये निर्दोष सुटले असते, पण मुक्ता दाभोलकर यांच्या सवंग प्रसिद्धीच्या लोभापायी हा खटला सुरु झाला नाही. ज्या मुलीच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्याचे मारेकरी लवकर सापडावेत म्हणून खटला लवकर सुरु करा अशी मागणी करण्याऐवजी खटला चालवू नका, अशी म्हणणारी मुक्ता दाभोलकर जगाच्या पाठीवर एकमेव मुलगी असेल, असेही अभय वर्तक म्हणाले. (Dabholkar Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.