ICG : जहाज बांधणीसाठी स्वदेशी सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचे उत्पादन, पुरवठ्यासाठी सामंजस्य करार

भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सध्या उथळ पाण्यात काम करण्यासाठी सक्षम ॲल्युमिनियम हुल असलेली ६७ जहाजे आहेत.

103
ICG : जहाज बांधणीसाठी स्वदेशी सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचे उत्पादन, पुरवठ्यासाठी सामंजस्य करार

भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज यांनी १० मे रोजी नवी दिल्ली येथे भारतीय सार्वजनिक आणि खासगी जहाज बांधणी कंपन्यांना जहाजांच्या बांधकामासाठी सागरी दर्जाच्या स्वदेशी ॲल्युमिनियमचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराअंतर्गत त्रैमासिक मूल्य आकारणी, पुरवठ्यासाठी प्राधान्य आणि एकूण उलाढालीवरील सवलत यांसारखे लाभही मिळतील. (ICG)

भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) ताफ्यामध्ये सध्या उथळ पाण्यात काम करण्यासाठी सक्षम ॲल्युमिनियम हुल असलेली ६७ जहाजे आहेत. किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने (ICG) आपल्या ताफ्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचा वापर करता येईल, अशी आणखी जहाजे समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. (ICG)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन)

भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) उपमहासंचालक (सामग्री आणि देखभाल), महानिरीक्षक एच के शर्मा आणि हिंडाल्को डाउनस्ट्रीम ॲल्युमिनियम बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कौल यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. (ICG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.