Open AI Search Engine : मायक्रोसॉफ्टचा पाठिंबा असलेली ओपन एआय कंपनी सोमवारी करणार सर्च इंजिनची घोषणा

Open AI Search Engine : इंटरनेटवरील ‘सर्च’ या लोकप्रिय प्रकारात आता गुगलला तगडी स्पर्धा येणार आहे.

84
Open AI Search Engine : मायक्रोसॉफ्टचा पाठिंबा असलेली ओपन एआय कंपनी सोमवारी करणार सर्च इंजिनची घोषणा
  • ऋजुता लुकतुके

ओपन एआय कंपनीने चॅट-जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित बॉट विकसित करून बाजारात खळबळ माजवून दिलीच आहे. आता याच तंत्रज्ञानावर आधारित सर्च इंजिनची घोषणा ते सोमवारी करतील अशी जोरदार चर्चा आहे. अशा सर्च इंजिनवर ते काम करत असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. या उपक्रमात त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीने साथ दिली आहे. सध्या इंटरनेट सर्चच्या क्षेत्रात गुगलची मक्तेदारी आहे. पण, ओपन एआयच्या माध्यमातून गुगलला तगडी स्पर्धा उभी राहू शकते. (Open AI Search Engine)

मंगळवारी गुगलने आपली एक खुली जागतिक परिषद आयोजित केली आहे. आणि या परिषदेत गुगलही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित आपले प्रोग्राम लोकांसमोर आणतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिषदेच्या एक दिवस आधी त्यांना धक्का देण्याच्या हेतूने ओपन एआयही आपली घोषणा करू शकतील. ब्लूमबर्ग कंपनीने यापूर्वीही तसं सुतोवाच केलं होतं. सर्च क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणून ओपन एआयच्या चॅट जीपीटी चॅटबॉटने क्रांती केली आहे. लिखित स्वरुपातील प्रश्नांना इंटेरनेट मायाजालमधील माहिती वापरून चॅट जीपीटी उत्तर देतं आणि तुमचं कामही पूर्ण करून देतं. (Open AI Search Engine)

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली रिली रसॉच्या गनशॉट सेलिब्रेशनची नक्कल करतो तेव्हा…)

इतक्या लोकांनी वापरला चॅट जीपीटी प्रोग्राम

पण, काही वेळा चॅट जीपीटीने दिलेली माहिती किंवा करून दिलेलं काम हे अपूर्ण किंवा चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चॅटबॉटने अजूनही तितकीशी विश्वासार्गता मिळवलेली नाही. चॅट जीपीटीला स्पर्धा म्हणून गुगलनेही आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सर्च इंजिनची घोषणा केली आहे. (Open AI Search Engine)

चॅट जीपीटी प्रोग्राम लाँच झाला तेव्हा १०० दशलक्ष लोकांनी काही महिन्यातच प्रोग्राम वापरून पाहिला होता. लोकांची चॅट जीपीटीकडे रिघ लागली होती. पण, अल्पावधीतच या प्रोग्रामच्या काही त्रुटी समोर आल्या. आणि तेव्हापासून चॅट जीपीटीचा वापर हा सतत कमी जास्त होत असतो. सुरुवातीचा उच्चांक पुन्हा गाठायला कंपनीला त्यानंतर वर्ष लागलं. आणि चॅट जीपीटी अजूनही पूर्णपणे विश्वासार्ह मानला जात नाही. (Open AI Search Engine)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.