Congress चे पाकिस्तान प्रेम पुन्हा दिसले – अनुराग ठाकूर

पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

67
Congress चे पाकिस्तान प्रेम पुन्हा दिसले - अनुराग ठाकूर

काँग्रेस (Congress) नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांना फार अपमानित करू नका असा इशारा केंद्र सरकारला दिला. यावरून भाजपा नेत्यांनी अय्यर यांच्यावर टीका केलीय. अय्यर यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम अधोरेखीत झाल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. (Congress)

यासंदर्भात ठाकूर म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे (Congress) नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तर भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणाले की, पाकिस्तानने जर काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Congress)

(हेही वाचा – ICG : जहाज बांधणीसाठी स्वदेशी सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचे उत्पादन, पुरवठ्यासाठी सामंजस्य करार)

कॉंग्रेसचे लोक बोलत आहेत दहशतवाद्यांची भाषा – गिरिराज सिंह

मणिशंकर अय्यर यांच्या बेताल वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्तानने डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कॉंग्रेसचे (Congress) लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली. (Congress)

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थन करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे (Congress) धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.