Women’s Reservation Bill : आरक्षणातून महिलांना अधिकार मिळतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

महिला शक्तीला अधिकार देण्याचा मोदी सरकारचा हा निर्णय आगामी काळात विकसित आणि समृद्ध भारताच्या उभारणीचा मुख्य आधारस्तंभ बनेल

111
Women's Reservation Bill : आरक्षणातून महिलांना अधिकार मिळतील - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

महिला आरक्षण विधेयकाच्या (नारी शक्ती वंदन कायदा) (Women’s Reservation Bill) माध्यमातून स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळतील असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार १९ सप्टेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) संसदेत मांडले. यावर भाष्य करताना गृहमंत्री अमित शहा बोलत होते.

(हेही वाचा – Women’s Reservation Bill : महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर; श्रेयवादावरून गदारोळ होऊन कामकाज तहकूब)

संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर शहा (Women’s Reservation Bill) म्हणाले की, ‘हा एक असा निर्णय आहे ज्यामुळे महिलांना त्यांचे अधिकार मिळतील.’ तर अमित शहा यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच याबात शहा यांनी ट्वीट करत देखील प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विटर संदेशात शहा म्हणाले की, पंतप्रधानांनी देशाच्या सनातन संस्कृतीला अनुसरुन ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमंते तत्र देवता’ हे देशाच्या लोकशाहीत लागू केले आहे. लोकसभेत मांडण्यात आलेले महिला आरक्षण (Women’s Reservation Bill) विधेयक त्याचाच एक भाग आहे. यामुळे आपल्या देशातील नारी शक्तीला त्यांचे योग्य अधिकार मिळणार आहेत. महिला नेतृत्व सक्षमीकरण’ ही केवळ सरकारची घोषणा नाही, तर एक संकल्प आहे. तर देशातील महिला शक्तीला अधिकार देण्याचा मोदी सरकारचा हा निर्णय आगामी काळात विकसित आणि समृद्ध भारताच्या उभारणीचा मुख्य आधारस्तंभ बनेल.

‘धोरण असो की नेतृत्व, भारताच्या स्त्री शक्तीने (Women’s Reservation Bill) हे सिद्ध केले आहे की त्या कोणत्याही क्षेत्रात कोणापेक्षा कमी नाहीत. मोदी सरकारचा असा विश्वास आहे की नारी शक्तीच्या पाठिंब्याशिवाय आत्मनिर्भर भारताची निर्मिती शक्य नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.