Sam Pitroda, तुम्हाला भारत कळलाच नाही!

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसवर कोणताच परिणाम झालेला नाही. केवळ निवडणुकीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हात वर केले आहेत. खरंतर कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून सॅम पित्रोदा चुकलेलेच नाहीत. कारण कॉंग्रेसची जडणघडण जातीय झालेली आहे.

155
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

जवाहरलाल नेहरूंना पाश्चात्य संस्कृतीचे खूपच आकर्षण होते. ते अपघाताने हिंदू आहेत, असेही त्यांनी प्रांजळपणे मान्य केलेले आहे. केंद्रिय राजकारणामध्ये पूर्वी नेहरुव्हियनचा खूप प्रभाव होता. त्यांना हिंदू असल्याची मुळातच लाज वाटत असल्यामुळेच त्यांनी वेळोवेळी हिंदूंवर टीका केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कॉंग्रेसची कानउघडणी बऱ्याचदा केली. पण झिंगलेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नसते, त्याप्रमाणे कॉंग्रेस स्वतःच्या भ्रष्ट विचारात झिंगलेली होती.

कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून सॅम पित्रोदा चुकलेलेच नाही

सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या वक्तव्याने देशातच नव्हे परदेशातही खळबळ माजवली आहे. त्यांनी भारतीयांच्या विविधतेवर भाष्य करताना म्हटले, ‘उत्तर भारतीय लोक गोरे युरोपियन लोकांसारखे दिसतात, तर पूर्व भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतातले लोक आफ्रिकन आणि पश्चिम भारतीय अरबांसारखे दिसतात.’ या विधानानंतर लोकांनी त्यांचा आणि कॉंग्रेसचा तीव्र निषेध केला. त्यानंतर पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला. कॉंग्रेसने त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई केली नाही व त्यांचा राजीनामाही मागितला नाही. यावरुनच स्पष्ट होते की त्यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसवर कोणताच परिणाम झालेला नाही. केवळ निवडणुकीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हात वर केले आहेत. खरंतर कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून सॅम पित्रोदा चुकलेलेच नाहीत. कारण कॉंग्रेसची जडणघडण जातीय झालेली आहे. सावरकर म्हणतात, ‘वस्तुतः राष्ट्रीय कॉंग्रेस ही न्याय्य अर्थानेच नव्हे तर विपरितपणेही जातीय आहे. कारण हिंदू बहुसंख्य नि मुसलमान अल्पसंख्य या विभागांना मान्यता देऊन पुन्हा वर मतदान, सांस्कृतिक अधिकार, सार्वजनिक नोकऱ्या ह्यांमधील बहुसंख्याकांना द्यावयाचे न्याय्य प्रमाण काढून घेऊन धार्मिक अल्पसंख्य मुसलमानांना देण्यास कॉंग्रेस भाग पाडत असते. हे मूल्य देऊन मुसलमानांकडून देशावरील भक्ती व संयुक्त राज्यातील निष्ठा विकत घेऊ पाहते.’

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा ‘मोठा’ निर्णय)

नेहरुंना पाश्चात्य संस्कृतीचे भयंकर आकर्षण होते

भारतीय संस्कृती ही मुळातच हिंदू संस्कृती आहे. कॉंग्रेसने हिंदू राष्ट्रवादाचा त्याग करुन हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला व त्यासही त्यांना न्याय देता आला नाही. आज कॉंग्रेस हिंदूद्रोही, देशद्रोही, वर्णद्वेषी वक्तव्ये करीत आहे, याचे मूळ कॉंग्रेसच्या भूतकाळात आहे. वर म्हटल्याप्रमाणे नेहरुंना पाश्चात्य संस्कृतीचे भयंकर आकर्षण होते. म्हणूनच त्यांनी ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. इंग्रजी ही आपली व्यवहाराची भाषा झाली. दक्षिण भारतात हिंदीचा द्वेष केला जातो, मात्र इंग्रजी अभिमानाने बोलली जाते. कारण नेहरुंना देश जोडता आला नाही. म्हणूनच काश्मीर इतकी वर्षे भारताचा भाग असूनही तिथे संविधान लागू होऊ शकले नाही. त्यामुळेच ‘नेहरुंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली.’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकरांचे वक्तव्य गांभार्याने घेण्यासारखे आहे. नेहरु हनीट्रॅपमध्ये फसले, पण याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागले.

सॅम पित्रोदा यांना हिंदुंविषयी प्रचंड द्वेष

सोनिया गांधींनी हिंदुस्थानाचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष केला. राहुल गांधींनी हाच कित्ता पुढे गिरवला. या लोकांनी ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ असा दिव्य संदेश देणाऱ्या हिंदुंना आतंकवादी म्हटले. आमच्या महापुरुषांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले. कारण गांधी-नेहरुंच्या पलीकडे यांचं विश्व कधीच नव्हतं आणि आता तर ड्युप्लिकेट गांधी कुटुंबाचं काटेरी कुंपण यांनी बसवून घेतलेलं आहे. म्हणूनच खेदाने म्हणावेसे वाटते की कॉंग्रेस आणि सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांना भारत कधीच कळला नाही आणि यापुढेही कळणार नाही. यांच्या मनामध्ये हिंदुंविषयी प्रचंड द्वेष आहे. हिंदुस्थानाविषयी प्रचंड चीड आहे. आता हिंदुंनी जागं होऊन निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. यासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. सावरकर म्हणतात, ‘हिंदुविरोधी व राष्ट्रविरोधी संघटनेला – जशी आज कॉंग्रेस झाली आहे – मते देऊन सांस्कृतिक, राजकीय, वांशिक आत्महत्या करण्याचा हिंदूंनी निश्चय केला तर मात्र ब्रह्मदेवसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही.’

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.