Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा ‘मोठा’ निर्णय

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याचा मोठा निर्णय

169
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा ‘मोठा’ निर्णय

राज्यात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते मंडळी ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. तिसऱ्या टप्प्यापर्यंत मतदान पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. प्रचारसभा व मतदानाच्या दिवशी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृह खात्याने (Home Department) मोठा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election 2024)

देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात पाहिल्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान झाले असून, उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी झाले तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ०७ मे रोजी पार पडले. तर चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यानंतर पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात (Mumbai Lok Sabha Election) २० मे रोजी मतदान होईल. निवडणुकीच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गृह खात्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील (Mumbai Police) सर्व पोलिसांच्या सुट्ट्या (Police holidays cancelled) निवडणुकीच्या दरम्यान रद्द केल्या आहेत. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मोबाईलसह प्रवेशबंदीवरुन पोलीस व मतदारांमध्ये वाद!)

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. १८ मे ते २० मे दरम्यान मुंबईतील सर्व पोलिसांच्या साप्ताहिक व इतर रजा रद्द राहतील, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजेचा देखील समावेश आहे. फक्त वैद्यकीय रजेला यामधून वगळण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.