T20 World Cup 2024 : ‘…तरंच रिषभ पंत टी-२० विश्वचषक संघात खेळू शकतो’ 

T20 World Cup 2024 : बीसीसीआयने रिषभ पंतच्या टी-२० विश्वचषकासाठी एक अट ठेवली आहे 

143
T20 World Cup 2024 : ‘…तरंच रिषभ पंत टी-२० विश्वचषक संघात खेळू शकतो’ 
T20 World Cup 2024 : ‘…तरंच रिषभ पंत टी-२० विश्वचषक संघात खेळू शकतो’ 
  • ऋजुता लुकतुके

एका भीषण रस्ते अपघातात जायबंदी झालेला रिषभ पंत (Rishabh Pant) १५ महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. आता आगामी आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. पण, त्याचवेळी टी-२० विश्वचषकातील त्याच्या संभाव्य सहभागावरही चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा एकीकडे सुरू असली तरी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी रिषभ पंतच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघातील संभाव्य समावेशाची अट एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केली आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Vasant More : अखेर राज ठाकरेंचा ‘वसंता’ गेला सोडून)

सध्या रिषभच्या तंदुरुस्तीवर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय पथक पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. आणि तो १०० टक्के तंदुरुस्त असेल तर संघ निवडीसाठी उपलब्ध असेल, असं जय शाह म्हणालेत. (T20 World Cup 2024)

‘तो चांगली फलंदाजी करतोय. यष्टीरक्षणही करू लागला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर भारतीय संघासाठी हे खूपच चांगलं आहे. तो भारतीय संघाची खूप मोठी जमेची बाजू आहे,’ असं जय शाह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. आणि त्याचबरोबर संघ निवडीसाठी एक अटही घातली. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाला मुकणार)

‘लवकरच वैद्यकीय पथक त्याला तंदुरुस्त जाहीर करेल. तो पूर्ण षटकं यष्टीरक्षण करू शकला तर तो संघात येऊ शकतो. आयपीएलमध्ये तो नेमकी कशी कामगिरी करतो ते आधी पाहू,’ असं त्याच्याविषयी बोलताना जय शाह म्हणाले. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या एका रस्ते अपघातानंतर रिषभ क्रिकेटपासून दूर आहे. इतर दुखापतींबरोबरच त्याच्या गुडघ्याला झालेली लिगामेंट दुखापत थोडी जास्त गंभीर होती. आणि तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करावी लागली. शिवाय त्याचं मनगट आणि घोटाही दुखापतग्रस्त झाला होता. (T20 World Cup 2024)

तो आयपीएलमध्ये खेळणार हे निश्चित आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही तसं स्पष्टपणे सांगितलं आहे. आता तो पूर्णवेळ यष्टीरक्षण करू शकेल का हे पाहावं लागणार आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.