T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाला मुकणार

T20 World Cup 2024 : घोट्या दुखापतीतून सावरणारा शामी सप्टेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल 

115
T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाला मुकणार
T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकाला मुकणार
  •   ऋजुता लुकतुके

घोट्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असलेला मोहम्मद शमी (Mohammed Shami) थेट सप्टेंबरमध्ये असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतच मैदानावर परतेल असं बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयपीएल बरोबरच जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो खेळणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. जून आणि जुलै महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Mumbai Metro 1 : अनिल अंबानींकडून मेट्रो 1 खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी)

३३ वर्षीय तेज गोलंदाज शामीला एकदिवसीय विश्वचषका दरम्यान घोट्याला दुखापत झाली होती. तो पडला नव्हता किंवा त्याचा पाय मुरगळला नव्हता. पण, घोट्यात अतिरिक्त पेशी साठून विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका दोरा तसंच अलीकडे इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिकाही तो खेळला नाही. आधी विश्रांती आणि उपचारांनी बरी होईल अशी वाटणारी दुखापत पुढे वाढली. आणि अखेर गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (T20 World Cup 2024)

‘शामीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. तो भारतातही परतलाय. आता बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत तो मैदानात पुनरागमन करू शकेल. तर के एल राहुलला इंजेक्शनची गरज आहे. त्यासाठी दोघंही बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहेत,’ असं जय शाह यांनी सांगितलं. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची लगबग; खासगी विमान, हेलिकॉप्टरला मोठी मागणी; भाडे ऐकून थक्क व्हाल)

सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येत असून तो भारतात २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. दुसरीकडे, के एल राहुल दुखापतीतून सावरला आहे. आणि लखनौ सुपरजायंट्सकडून तो आयपीएल खेळणार आहे. (T20 World Cup 2024)

आयपीएलमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा रस असल्याच्या बातमीचंही जय शाह यांनी खंडन केलं. ‘बीसीसीआय ही कंपनी नाही तर नोंदणीकृत सोसायटी आहे. त्यामुळे कायद्यानुसार, आयपीएलमध्ये परकीय गुंतवणूक घेतली जाऊ शकत नाही,’ असं शाह यांनी स्पष्ट केलं. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- WPL 2024 : मेरी कोम, करिना कपूरने वाढवली डब्ल्यूपीएल सामन्याची रंगत )

गेल्यावर्षी सौदी अरेबियातील कंपनी आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात होतं. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.