Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची लगबग; खासगी विमान, हेलिकॉप्टरला मोठी मागणी; भाडे ऐकून थक्क व्हाल

लोकसभा निवडणुकीदरम्यान खासगी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरची मागणी मागील निवडणुकीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रति तास शुल्कातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

139

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची प्रचारासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज या उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. यावेळी ग्रामीण, निमशहरी भागात प्रचारावर भर दिल्याने, या भागात हेलिकॉप्टर सहज आणि कमी वेळेत पोहोचू शकते, त्यामुळे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विमाने आणि हेलिकॉप्टर्सची आगाऊ नोंदणी 

यावेळी निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरची मागणी जास्त असेल. राजकीय पक्ष काही मध्यस्थ त्यांच्या ग्राहकांसाठी भाडेतत्त्वावरील विमाने हेलिकॉप्टरची आगाऊ नोंदणी करत आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरचे तासाचे दर लक्षणीयरित्या वाढले आहेत. चार्टर्ड हेलिकॉप्टर सुमारे दीड लाख रुपये प्रति तास दराने भाड्याने बेतले जात आहे. काही ठिकाणे, तासाचे दर ३.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चार्टर्ड विमानासाठीचा दर प्रति तास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपयांपर्यंत असू शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. खासगी विमान कंपन्यांना ठराविक वेळापत्रक नसते आणि जेव्हा गरज असते तेव्हा त्यांचे विमान आणि हेलिकॉप्टर उड्डाण करतात. सध्या देशात अशा कंपन्यांकडे हेलिकॉप्टरसह सुमारे ४५० विमाने आहेत.

(हेही वाचा Social Media : ऑनलाईन मीडिया आणि सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी समिती होणार कार्यान्वित)

यंदा मागणी वाढली 

खासगी कंपन्यापैकी निम्म्या कंपन्यांकडे एक किंवा दोन विमान वाहतूक महासंचालनालयात आकडेवारीनुसार, या विमान आणि हेलिकॉप्टरची आसन क्षमता किमान तीन ते कमाल ३७ पर्यंत आहे. बहुतेक हेलिकॉप्टरची आसन क्षमता दहापेक्षा कमी आहे. राजकीय नेते छोट्या शहरांमध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरची निवड मोठ्या प्रमाणात करतील, त्यामुळे हेलिकॉप्टरची मागणी अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024), खासगी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरची मागणी मागील निवडणुकीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रति तास शुल्कातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी किमान शुल्क दर

  • हेलिकॉप्टरसाठी (प्रतितास) – दीड ते साडे तीन लाख रुपये
  • चार्टर्ड विमान (प्रतितास) – ४.५ ते ५.२५ लाख रुपये

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.