Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार

105
Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार
Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणेंच्या (Narayan Rane) प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना नारायण राणेंनी (Narayan Rane) उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला. ही सभा शिर्के हायस्कूल मैदान येथे पार पडली. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित नव्हते. पण, राणेंनी यावेळी त्यांचे आभार मानले. भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही. असे ही ते म्हणाले. (Narayan Rane)

उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) नाहीत, त्यामुळे त्यांची आठवण येते. पाठिंबा दिला त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली. मनसेची सभा आणि उबाठा गटाची सभा हा योगायोग आहे. उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं. मनसे आणि माझे जवळचे संबंध आहेत. मला मत म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. चांगल्याला चांगलं म्हणायची वृती राज ठाकरेंकडे आहे.” (Narayan Rane)

भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही

“जो माणूस आवडत नाही त्याबद्द्ल प्रश्न विचारले जातात. मोदींनी जगाच्या अर्थ व्यवस्थेत भारताला पुढे आणलं. मोदींची कामाची आणि निर्णय घेण्याची पद्धत देशाच्या हिताची आहे. ही सगळी धोरण राज ठाकरेंना आवडली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला. निवडून आलो तर सांगाल ती कामे वर्षाच्या आत करण्याची माझी क्षमता आहे. मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही. भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही.” (Narayan Rane)

…तर रस्ते बंद करेन

“बाजूच्या सभेत विचारवंत काय बोलतात यासाठी कार्यकर्ता पाठवला होता. मोदींवर टीका, शाहांवर टीका केली. खोके खोके बोलता तर मी मातोश्रीवर बोके सोडलेले नाहीत. माझ्या एवढं मातोश्री कोणाला माहित नाही. वेळ आली तर सगळं काढेन. मोदींवर बोलला तर रस्ते बंद करेन. उध्दव (Uddhav Thackeray) विकृत माणूस आहे. दुसऱ्याच चांगलं पाहवत नाही. चाळीस वर्षे सोबत होतो. उध्दवनी महाराष्ट्राची लाज घालवली. GDP च्या प्रश्नावर उध्दव निरुत्तर झाले होते. कोकणात आग लावायला आलेत. काही द्यायला आलेले नाहीत. दोन्ही जिल्ह्यातील गावं आणि तालुके माहित नाहीत.” असंही नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटलं आहे. (Narayan Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.