IPL 2024, Dhruv Jurel : ध्रुव जुरेलचं कुटुंब त्याचं आयपीएल अर्धशतक पाहण्यासाठी मैदानावर येतं तेव्हा…

IPL 2024, Dhruv Jurel : ध्रुव जुरेल झारखंडच्या अगदी गरीब कुटुंबातून येतो 

105
IPL 2024, Dhruv Jurel : ध्रुव जुरेलचं कुटुंब त्याचं आयपीएल अर्धशतक पाहण्यासाठी मैदानावर येतं तेव्हा…
IPL 2024, Dhruv Jurel : ध्रुव जुरेलचं कुटुंब त्याचं आयपीएल अर्धशतक पाहण्यासाठी मैदानावर येतं तेव्हा…
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थानने आपला युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला (IPL 2024, Dhruv Jurel) फलंदाजीत बढती दिली. याचा पुरेपूर फायदा उचलत त्याने ३४ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारली. त्याच्या जोरावर मग राजस्थानने हा सामनाही ७ गडी राखून जिंकला. गुण तालिकेत अव्वल क्रमांक कायम राखतानाच बाद फेरी गाठण्यावरही शिक्कामोर्तब केलं. जुरेलने या खेळीदरम्यान २ षटकार आणि ५ चौकार लगावले. कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) सह त्याने दुसऱ्या गड्यासाठी १२१ धावांची भागिदारीही केली. सॅमसनने नाबाद ७१ धावा केल्या. (IPL 2024, Dhruv Jurel)

(हेही वाचा- Best Bus Fares : बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा, लवकर होणार बस प्रवासात वाढ?)

या सामन्यानंतर आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक भावनात्मक संदेश शेअर झाला आहे. यात युवा ध्रुव जुरेल आयपीएलमधील पहिलं अर्धशतक आपल्या कुटुंबीयांसह साजरं करताना दिसतोय. (IPL 2024, Dhruv Jurel)

ध्रुव जुरेलचे (IPL 2024, Dhruv Jurel) वडील सैन्यात आहेत. ते मैदानावर असतील तर चांगली कामगिरी केल्यावर जुरेल त्यांना सैन्यातील सॅल्युट ठोकून मानवंदना देतो. तसंच त्याने या अर्धशतकानंतरही केलं. हे अर्धशतकही त्याने आपल्या वडिलांना समर्पित केलं. त्याची ही कामगिरी पाहण्यासाठी त्याचं अख्खं कुटुंब उपस्थित होतं. (IPL 2024, Dhruv Jurel)

(हेही वाचा- HSC, SSC Result: दहावी, बारावीच्या निकालाची तारिख आली समोर, बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल)

‘सुरुवातीला मी चेंडू नीट खेळत नव्हतो, तेव्हा संजू सॅमसनने (Sanju Samson) मला शांत केलं. त्यानंतर मी शेवटपर्यंत खेळण्याचा निर्धार केला होता. विजयाची औपचारिकता पूर्ण होण्यापर्यंत टिकू शकलो हे मला छान वाटलं,’ अशी प्रतिक्रिया जुरेलने सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. सामन्यात जोस बटलर (Jos Butler) आणि यशस्वी जयसवाल यांनी ६० धावांची सलामी दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सनी तीन गडी झटपट गमावले होते. पण, त्यानंतर जुरेल आणि सॅमसनने भागिदारी रचून १९७ धावांचं आव्हान १९ व्या षटकातच पार केलं. (IPL 2024, Dhruv Jurel)

भारताचा टी-२० विश्वचषकासाठीचा संघ आता कधीही जाहीर होऊ शकतो. या संघातही जुरेलच्या नावाची चर्चा आहे. (IPL 2024, Dhruv Jurel)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.