Best Bus Fares : बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा, लवकर होणार बस प्रवासात वाढ?

6644
Best Bus : बेस्टला महापालिकेचा आधार, दिले ८०० कोटी रुपये!
Best Bus Fares : बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा, लवकर होणार बस प्रवासात वाढ?
  • सचिन धानजी,मुंबई

तोट्यात असलेल्या बेस्टला यापूर्वीचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी (Pravin Singh Pardeshi) आणि त्यानंतर इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी भरभरुन दिल्यानंतर विद्यमान महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी मात्र बेस्टला अजोय मेहता यांच्याप्रमाणेच नियम दाखवत आर्थिक मदत करण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे बेस्टला आता महापालिकेकडून एकाही पैशाची मदत मिळणार नसून बेस्टचा रहाटगाडा चालवण्यासाठी आता बेस्ट उपक्रमासमोर बस तिकीट दरवाढ केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे बेस्ट बस तिकीटची दरवाढ केली जाण्याची शक्यता असून आजवर केवळ महापालिकेने घातलेल्या बंधनामुळे ही तिकीट दरवाढ केली जात नव्हती. परंतु अशाप्रकारची कोणतीही अट किंवा लिखित करार केल्याची नोंदच आढळून न आल्याने अखेर बेस्ट प्रशासनाचा बस तिकीट दरवाढ करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. (Best Bus Fares)

(हेही वाचा- Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान )

काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजवणी केल्यानंतरच…

बेस्ट उपकम तोट्यात चालत असल्याने महापालिकेच्यावतीने त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत असतानाच तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमाला काटकसरीच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामुळे काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजवणी केल्यानंतरच आर्थिक मदत देण्याचा विचार केला जाईल, अशाप्रकारचा पावित्रा अजोय मेहता यांनी घेतला होता. (Best Bus Fares)

दरमहा बेस्टला १२५ कोटींचा मदत

परंतु अजोय मेहता यांची बदली होऊन त्यांच्या जागी महापालिका आयुक्त म्हणून प्रविण सिंह परदेशी (Pravin Singh Pardeshi) आल्यानंतर त्यांनी पहिल्याच आठवड्यात तत्कालिन महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत बेस्टला दर महिन्याला १२५ कोटी रुपये याप्रमाणे वर्षाला १५०० रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेस्टला सन मे २०१९ पासून आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून तरतूद केल्याप्रमाणे तसेच बेस्टच्या मागणीनुसार अतिरिक्त याप्रकारे आतापर्यंत विविध प्रकारे उपक्रमाला आर्थिक मदत करण्यात येत असून ही रक्कम आतापर्यंत सुमारे ८००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. (Best Bus Fares)

(हेही वाचा- PM Modi in Pune: पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर)

बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात

मागील महिन्यात बेस्ट उपक्रमाने महापालिकेकडे  दरमहा सुमारे दीडशे कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. बेस्टने पाठवलेल्या या पत्रामध्ये जुलै २०२३ पासून बेस्टच्या परिवहन विभागात  सुमारे ७७५ कोटी रुपयांची आर्थिक तुट असल्याचे नमुद करून दरमहा  १५० रुपयांची मदत व्हावी असे साकडे घातले होते. बेस्टला महापालिकेने आतापर्यंत तरतुदींमधून ३४२५ कोटी आणि तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान म्हणून सुमारे ४६४६ कोटी रुपयांची अशाप्रकारे एकूण ८०७१ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही सर्व आर्थिक मदत ही सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम,  वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरचे थकीत रक्कम देण्यासह इतर कामांसाठी दिली होती. परंतु आजवर दिलेल्या या सुमारे ८ हजार कोटींच्या खर्चाचा हिशोबच बेस्टने अद्याप दिलेला नाही. (Best Bus Fares)

उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधा…

दरम्यान, मागील आठवड्यात महापलिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्यासमवेत बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (Anil Diggikar), अतिरिक्त आयुक्त प्रकल्प अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांच्यासह महापालिका लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी डिग्गीकर यांनी बेस्टला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. परंतु महापालिका आयुक्त यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता बेस्टला यापुढे मदत देण्यास असर्थता दर्शवली आहे. यावेळी आयुक्तांनी बेस्टला उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करण्याचे आणि काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. (Best Bus Fares)

(हेही वाचा- Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल)

बेस्टच्या बस तिकीट दरवाढीला

मात्र, यावेळी बेस्टच्या वतीने बस तिकीट वाढ न  करण्याचे बंधन महापालिकेने घातले असून तसा करारच  झाल्याने बेस्टला सध्याच्या सहा रुपयांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करता येत नसल्याचे सांगितले. पण महापालिकेने असे कोणतेही बंधन घातले नसून बेस्टकडे अशाप्रकारचे लिखित करार असल्यास ते सादर करावे असे आयुक्तांनी  विचारले. परंतु त्यावर महापालिकेचे अधिकारी व बेस्टचे अधिकारी यांनीही अशाप्रकारचा कुठलाही करार आपल्याकडे झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिकीट दरवाढ न करण्याचा कोणताही लिखित करार किंवा आदेशच नसल्याने आता बेस्टचा तिकीट दरवाढीचा मार्गच मोकळा झाला आहे. (Best Bus Fares)

शेअर रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढले, तरीही बेस्टचा गारेगार प्रवास सहा रुपयांतच

बेस्टचे सध्या किमान भाडे सहा रुपये असून जिथे शेअर टॅक्सी व रिक्षांमध्ये प्रती व्यक्ती दहा ते पंधरा रुपये भाडे आकारले जाते, तिथे बेस्ट बसमध्ये वातानुकूलित प्रवास अवघ्या सहा रुपयांमध्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे किमान दहा रुपयांचे बस तिकीट झाल्यास बेस्टच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पर्यायाने पाच आणि एक रुपयांच्या चिल्लरमध्ये होणारा मनस्तापही कमी होईल असे बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने आर्थिक मदत देण्यास असमर्थता दर्शवल्याने तिकीट दरवाढीचा पर्याय मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे आजवर महापालिकेच्या बंधनामुळे ही दरवाढ केली जात नव्हती, परंतु त्याबाबतही आता दोन्ही प्रशासनात स्पष्टता निर्माण झाल्याने बेस्ट बस तिकीट दरवाढ करण्याचा विचार करत असल्याचे उपक्रमाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Best Bus Fares)

(हेही वाचा- Red Sea: हौथींनी लाल समुद्रात केला पुन्हा हल्ला, तेलाच्या टँकरचे नुकसान; अमेरिकेचे ड्रोन पाडले)

मागील मार्च महिन्यांत बेस्टने मासिक व दैनंदिन बस पासांच्या दरातमध्ये वाढ केली आहे, परंतु तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती, परंतु आता तिकीट दरा.तही वाढ केली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. (Best Bus Fares)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.