PM Modi in Pune: पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर

142
Lok Sabha Election 2024: पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
Lok Sabha Election 2024: पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

भाजपचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi in Pune) आज (२९ एप्रिल) सभा घेणार आहेत. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान मोदींची (PM Modi) सभा होणार आहे. मोदींची पुण्यातील सभा (PM Modi in Pune) गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन पुण्यातील रस्ते वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. (PM Modi in Pune)

पुण्यातील खालील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद

टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता बंद

सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद

बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद

पुणेकरांना पर्यायी मार्ग उपलब्ध

गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी

भैरोबानाला ते लुल्लानगर ते इछित स्थळी

वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी

मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी

सभेसाठी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला (PM Modi in Pune) येणाऱ्यांसाठी वाहनतळांची (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे. होम मैदानाजवळील मार्केट पोलिस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून येणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून वाहने जुनी मिल कंपाउंड व मरिआई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंडवर लावावीत. तसेच अक्कलकोटकडून येणाऱ्यांना सिव्हिल चौकातून नूमवि प्रशालेमागून किंवा पुंजाल मैदान येथून यावे लागणार आहे. त्यांची वाहने मुलांचे शासकीय वसतिगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोडवरून येणाऱ्यांनी विजापूर रोड, पत्रकार भवन, मोदी पोलिस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सभेला यावे. त्यांची वाहने संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाइड मैदान किंवा नूमवि प्रशालेजवळील मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या मैदानावर लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळविले आहे. (PM Modi in Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.