Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

150
Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल
Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते प्रचारसभेत व्यस्त आहेत. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल होताच भाजपावर जोरदार टीका होऊ लागली. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजपा नेत्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Amit Shah)

हा व्हिडीओ नेमका कुणी एडिट केला. तो सोशल मीडियावर कोणकोणत्या व्यक्तींनी व्हायरल केला, याची माहिती दिल्ली पोलिसांकडून (Police) मागवण्यात आली आहे. देशभरात अशी ‘X’हँडल चालवणारे स्पेशल सेलच्या रडारवर आहेत. या प्रकरणी लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – PM Modi in Pune: पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर)

या व्हायरल व्हिडियोमध्ये ‘आमची सत्ता आल्यानंतर SC,ST आणि OBC यांचं आरक्षण आरक्षण आणलं जाईल’, असं अमित शहा म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडियो बनावट असून भाजपाविरोधात द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही व्हिडियोची दखल घेऊन पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे. या व्हिडियोसंदर्भातील एएनआय या वृत्तवाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे प्रसिद्ध केले आहे.

देशभरात एफआयआरची नोंद
पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करणाऱ्या व्यक्तींचादेखील शोध घेतला जातोय. दुसरीकडे भाजपाने या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून देशभरात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडीओमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.